इंडियन प्रीमियर लीगला जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग मानले जाते. भारताचे अनुकरण करून जगातील अनेक देशांनी आयपीएलसारखी आपली स्वतःची लीग सुरू केली. आज कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास प्रत्येक देशाकडे आपली स्वतःची टी-20 लीग आहे. यात बहुतांश संघ हे आयपीएल फ्रँचायझींच्या मालकिचे आहेत. अशातच आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी एक धोक्यायची घंटा वाजताना दिसत आहे.
आयपीएल फ्रँचायझींनी (IPL Franchise) दक्षिण आफ्रिका टी-20, कॅरेबियन प्रीमियरल लीग, यूएई टी-20 लीग आणि अमेरिकातील टी-20 लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. या फ्रँचायझी आपला व्यावसाय वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. अशातच अशी माहिती समोर येत आहे की, या आयपीएल फ्रँचायझींनी ऑस्ट्रेलियन संघाच्या काही प्रमुख खेळाडूंशी संपर्क केला आहे. फ्रँचायझींकडून मोठ्या काळ खेळण्यासाठी खेळाडूंनी 7.5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये हा करार होऊ शकतो. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ए एजच्या माहितीनुसार ज्या आयपीएल फ्रँचायझींनी जगभरात संघ खरेदी केले आहेत, त्या फ्रँचायझी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ही मोठी रक्कम देऊन करारबद्द खरून घेऊ इच्छित आहेत, जेणेकरून हे खेळाडून वेगवेगळ्या लीगसाठी उपलब्ध राहतील.
मागच्या काही वर्षांमध्ये खेळाडू राष्ट्रीय संघाच्या तुलनेत आयपीएलसारख्या लीगला अधिक प्राधान्य देता, असे अनेकदा बोलले गेले आहे. क्रिकेटचे जाणकार देखील अनेकदा याविषयी व्यक्त झाले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियावर नेमकी हीच अडचण येण्याची शक्यता आहे. फ्रँचायझीकडून मोठी रक्कम मिळणार असल्याने खेळाडू राष्ट्रीय संघाला दुय्यम माणू शकतात. भविष्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंना राष्ट्रीय संघाचा करार स्वीकरण्यास नकार दिला, तर यात वागवे वाटण्यासारखे काही नसेले.
न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि मार्टिन गप्टिल यांनी मागच्या वर्षी असेच गेले होते. या दोघांनीही मागच्या वर्षी राष्ट्रीय संघाशी करार करण्यास नकार दिला होता, ज्यानेकरून त्यांना विदेशातील वेगवेगळ्या फ्रँचायझींमध्ये खेळता येईल, आयपीएल 2023च्या सुरूवातील न्यूझीलंड संघ श्रीलंका विरुद्ध मायदेशात टी-20 मालिका खेळत होता. पण ट्रेंट बोल्ट मात्र पहिल्या सामन्यापासून आयपीएल खेळत आहे. इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू वनडे आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त झाला आहे आणि सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. आयपीएल 2023 मध्ये स्टोक्स चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा भाग आहे. पण आयपीएलनंतर भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात स्टोक्स इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणार नाहीये.
मागच्याच आढवड्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) त्याच्या राष्ट्रीय संघाच्या कराराची बदल रक्कम वाढवली होती. पण तरीदेखील आयपीएल फ्रँचायझींकडून मिळणारी 7.5 मिलियन्सची रक्कम डावलणे खेळाडूंसाठी कठीण असेल. (Australian players have been offered huge offers by IPL franchises)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेपटून लग्नबंधनात, मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत थाटला संसार
लसिथ मलिंगाचा सर्वात मोठा आयपीएल विक्रम उद्ध्वस्त! हंगामातील पहिल्याच सामन्यात रबाडाची मोठी कामगिरी