महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनानंतर कुटुंबातील सदस्यांना राजकीय इतमामात त्याचे अंतिम संस्कार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. वॉर्न हा जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज मानला जात होता. शुक्रवारी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता.
वॉर्नच्या निधनावर व्हिक्टोरिया प्रांताचे प्रमुख डॅनियल अँड्र्यूज म्हणाले, “व्हिक्टोरियाने एक आयकॉन गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने एक दिग्गज गमावला. फिरकी गोलंदाजीचा राजा असलेल्या वॉर्नच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट जग शोक करत आहे. शेन वॉर्नने क्रिकेटपटूंच्या नवीन पिढीला प्रेरणा दिली.” व्हिक्टोरियातील लोकांना आदरांजली वाहता यावी यासाठी, मी शेन वॉर्नच्या कुटुंबीयांना शासकीय सन्मानाने त्याच्या अंत्यसंस्काराचा प्रस्ताव दिला आहे.”
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही माजी क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली आहे. मॉरिसन यांनी ट्विट केले की, ‘ऑस्ट्रेलियातील लोकांना शेन वॉर्नच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. तो अवघ्या ५३ वर्षांचा होता. वॉर्न आमच्या महान खेळाडूंपैकी एक होता. तो अशा लोकांपैकी एक होता ज्यांनी डॉन ब्रॅडमन यांच्याप्रमाणेच असामान्य कामगिरी केली.’
‘त्याच्या कर्तृत्वातून त्याची प्रतिभा, शिस्त आणि खेळाबद्दलची त्यांची आवड दिसून येते. परंतु शेन वॉर्न ऑस्ट्रेलियन लोकांसाठी अधिक आदरास पात्र होता. तो दिग्गजांपैकी एक होता. सर्वांनी त्याच्यावर प्रेम केले. आम्ही प्रत्येकजण त्याच्याबद्दल खूप दुःखी आहोत. रॉड मार्श यांच्या निधनानंतर एक दिवसात असे होईल याची कोणीही कल्पना केली नसेल. शेनसारखा कोणीही नव्हता. त्याने आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगले. त्याची कामगिरी अतुलनीय होती.’ असे मॉरिसन पुढे म्हणाले.
वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर कसोटी पदार्पण केले होते. त्याने १४५ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने ७०८ विकेट घेतल्या. वॉर्नने १९४ वनडेत २९३ विकेट घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नची शेवटची २० मिनिटे, नेमकं काय घडलं होतं? वाचा संपूर्ण घटनाक्रम (mahasports.in)
दक्षिण आफ्रिका महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी; बांगलादेशला चारली धूळ (mahasports.in)