बिग बॅश लीगचा आठवा सामना होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स या संघात खेळला गेला. हरिकेन्सने या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हरिकेन्सने स्कॉर्चर्स संघाला 173 धावांचे आव्हान दिलेे होते. मात्र, स्कॉर्चर्स संघाला 164 धावा करता आल्या. या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड यानेे एक लाजीरवाणे कृत्य केले. यामुळे त्याला माफी देखील मागावी लागली.
पर्थ स्कॉर्चर्स संघाचा सलामीवीर फॅफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) घातक सिद्ध ठरत होता. तो 15 चेंडूत 32 धावांवर खेळत होता. चौथ्या षटकात पॅट्रीक डूली (Patrick Dooley) गोलंदाजी करण्यासाठी आला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फॅफ फलंदाजी करत होता, गोलंदाजाने चेंडू टाकताच मॅथ्यू वेड (Matthew Wade) जोरात ओरडला ‘बोल्ड’. यामुळे फॅफचे ध्यान भटकले आणि तो बोल्ड झाला. तो या सामन्यात चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत होता. त्याच्या या विकेटमुळे स्कॉर्चर्स संघाला पराभव स्वीकारावा लागल असेही मानलेे जात आहे.
Paddy Dooley is pumped and rightly so!#BBL12 pic.twitter.com/XT4dzZDxC7
— cricket.com.au (@cricketcomau) December 19, 2022
वेड याला मागावी लागली माफी
वेड माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “मी खूप लवकर बोल्ड बोललो. मला माहिती नाही, पण मला वाटत होते की तो नाराज होता. मी फॅफची माफी मागतो. ” मॅथ्यू वेेड याने या सामन्यात 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यात त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले.
इंग्लंड विरुद्धच्या टी20 साामन्यात देखील वेडने केली होती लाजीरवाणे कृत्य
ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात होती. पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने 17 व्या षटकात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू खेळपट्टीच्या जवळच पडणार होता. त्यावेळी मार्क वूड झेल घेण्यासाठी पुढे सरसावला, पण तेवढ्यात वेडने त्याला धक्का दिला. ज्यामुळे तो बाद होण्यापासून वाचला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडे टीम इंडियातून हाकालपट्टी, तिकडे पठ्ठ्याने रणजीत ठोकली ‘डबल सेंच्युरी’
सुरेश रैनाचा आयपीएलमध्ये नवा ‘अवतार’, ‘या’ भुमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला