कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू असताना,सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून होता. आधी त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. त्यानंतर भारतात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी ५० हजार डॉलर्सची मदत जाहीर केली होती. तसेच रविवारी (९ मे) जगभरात मदर्स डे साजरा केला गेला. याच खास दिवशी पॅट कमिन्सला त्याच्या होणाऱ्या पत्नीने गोड बातमी सांगितली आहे.
सध्या सोशल मीडियावर पॅट कमिन्स सर्वत्र झळकत असताना त्याची होणारी पत्नी बेकी बॉस्टन हीने गोड बातमी सांगितली आहे. ती लवकरच आई होणार आहे. दोघांनी फेब्रुवारी २०२० मध्ये साखरपुडा केला होता.
तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील त्यांच्या आनंदात सहभाग घेतला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांचेही फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, “किती मस्त बातमी. तेही मदर्स डेच्या दिवशी.” या फोटोवर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या समर्थकांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
What a fantastic piece of news on #MothersDay! 💐👶🏻
Send your love and good wishes for the couple in 💬 below ⤵️https://t.co/LDbY2DcYwj #IPL #PatCummins #BeckyBoston #Cricket @patcummins30
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 9, 2021
तसेच कमिन्सची होणारी पत्नी बेकी बॉस्टन हीने देखील ही गोड बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटोज् शेअर करत दिली आहे. तिने बेबी बंपचे फोटोज् शेअर करत लिहिले की, “मी हा आनंद आणखी लपवून ठेवू शकत नाही. बेबी बॉस्टन कमिन्स वसंत ऋतूपर्यंत आपल्यासोबत असेल. तो तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे.” तिने या फोटोमध्ये पॅट कमिन्सला टॅग केले आहे.
https://www.instagram.com/p/CN_76WXrDSY/?igshid=14sph9mh4n8lv
आयपीएल २०२१ स्पर्धेतील पॅट कमिन्सची कामगिरी
आयपीएल २०२१ स्पर्धेत कमिन्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ७ सामने खेळले. या ७ सामन्यांमध्ये त्याने ९ गडी बाद केले होते. यासोबतच त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध खेळलेली नाबाद ६६ धावांची खेळी ही आयपीएल २०२१ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. तर ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ सामने खेळले. यात त्यांना अवघ्या २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर उर्वरित ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गुणतालिकेत ४ गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ ७ व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ओहो! कोणाचीही फिकीर न करता राहुल तेवतियाचा खुल्लम खुल्ला प्रपोजल, पाहा तो भारी क्षण
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचा थाटच न्यारा, कोट्याधीश नव्हे तर चक्क अब्जाधीशांच्या घरचे आहेत लाडके जावई
‘त्याच्या’मुळेच सीएसके संघ यंदा आयपीएलमध्ये टिकून राहू शकला, पाहा दिग्गजाने कोणाची केली स्तुती