ऍशेस 2023 इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. पण बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वातील इंग्लंड क्रिकेट संघाला या मालिकेत अद्याप यश मिळाले नाहीये. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघआने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया सध्या 0-2 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील राहिलेल्या तीन सामन्यांसाठी सोमवारी (3 जुलै) ऑस्ट्रेलियाने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. दिग्गज नेथन लायनचे नाव यात नव्हते.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातीत पहिला कसोटी सामना एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला होता. नेथन लायन (Nathan Lyon) ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता आणि त्यांना 2 विकेट्सने विजय मिळला होता. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीतही लायन आपल्या फिरकीची कमाल दाखवू शकत होता. पण दुखापतीमुळे त्याला हा सामना अर्ध्यात सोडावा लागला. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याला ही दुखापत झाली, ज्यामुळे तो व्यवस्थित चालू शकत नव्हता. लायनची ही दुखापत गंभीर असून संपूर्ण मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. अशात राहिलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या जागी युवा टॉड मर्फी (Todd Murphy) ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो.
टॉड मर्फीने आपल्या कसोटी पदार्पणाच्या मालिकेत भारताविरुद्ध 14 विकेट्स घेतल्या होत्या. 22 वर्षीय मर्फीने यावर्षीच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये कसोटी पदार्पण केले. मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्याने 2.57 व्या इकॉनॉमीने आणि 25.21च्या सरासरीने धावा खर्च केल्या आणि 14 विकेट्स घेतल्या. यात विराटला त्याने चार वेळा बाद केले. ऑस्ट्रेलियन संघात अजून एक मोठा बदल म्हणजे मॅथ्यू रेनशॉ याला संघातून वगळण्यात आले आहे. संघात मायकल नेसन आणि यष्टीरक्षक जिमी पीरसन य़ांना सामील केले गेले आहे. ऍशेस 2023चा तिसरा सामना हेडिंग्लेच्या लीड्स स्टेडियमवर 6 ते 10 जुलैदरम्यान खेळला जाणार आहे. (Australian squad list for last three matches of Ashes 2023)
ऍशेस 2023च्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कैरी (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, मिच मार्श, टॉड मर्फी, माइकल नेसर, जिमी पीरसन (यष्टीरक्षक), स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेविड वार्नर.
महत्वाच्या बातम्या –
लॉर्ड्सच्या लॉंग रूममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की, एमसीसीने केली तडक कारवाई
ऑस्ट्रेलियाचा ‘लायन’ ऍशेसमधून बाहेर! 12 वर्षानंतर प्रथमच नाही घालणार बॅगी ग्रीन