---Advertisement---

अक्षरच्या ब्रह्मास्त्रामुळे ऑस्ट्रेलियन संघ चिंतेत! भारतात पोहोचताच सुरू केली ‘ऑनलाईन’ तयारी

On: गुरूवार, फेब्रुवारी 2, 2023 6:11 PM
Axar Patel
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका पुढील महिन्यात सुरू होत आहे. 9 फेब्रुवारी रोजी चार सामन्यांची ही कसोटी मालिका सुरू होईल. मागील सोळा वर्षापासून भारतात कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न घेऊन पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला आहे. भारतात पोहोचल्यानंतर 24 तासाच्या आतच त्यांनी आपल्या नियोजनास सुरुवात केली.

उभय संघांमधील पहिला सामना नागपूर येथे होणार असला तरी, ऑस्ट्रेलियन संघ बंगलोर येथे सराव करत आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत खिडकीपटू अक्षर पटेल याला सर्वात मोठा धोका मानत आहे. कारण, ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन स्लाइडर चेंडूंचे व्हिडिओ पाहत त्यावर योजना बनवताना दिसला.

भारतीय संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव हे चार फिरकीपटू आहेत. या चौघांपैकी केवळ अक्षर हाच स्लाइड चेंडूंचा वापर हा चेंडू अधिक फिरकी न घेता वेगात यष्ट्यांवर येत असल्याने फलंदाजांना तो खेळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ अक्षर पासून काहीसा सावध राहण्याचा प्रयत्न करत आहे.

जवळपास दोन वर्ष आधी अक्षर हा केवळ वनडे व ‌‌‌‌‌‌‌टी20 क्रिकेटचा गोलंदाज म्हणून ओळखला जात होता. मात्र, कसोटी संघात पदार्पण केल्यापासून अक्षरने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 8 कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी 47 बळी टिपले असून, पाच वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी त्याच्या नावे नोंद झालीये. उभय संघातील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर खेळला जाईल.

(Australian Team Watching Video Of Axar Patel And Sliders Ahead Border-Gavaskar Trophy 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये पास झाला पठ्ठ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---