---Advertisement---

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या १३ खेळाडूंना मिळाली संधी

---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 12 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला वगळले आहे. तो नुकत्याच झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. पण त्याला एकाही सामन्यात 11 जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती.

तसेच आता त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठीही वगळण्यात आले आहे. पण असे असले तरी तो ऑस्ट्रेलियाच्या राखीव खेळाडूंमध्ये असेल.

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व टिम पेन करणार आहे. त्याचबरोबर या संघात डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, जो बर्न्स, ट्रेविस हेड हे फलंदाज असतील. तर मिशेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन, जोश हेजलवूड, नॅथन लायन असे गोलंदाजही ऑस्ट्रेलियाच्या संघात आहेत.

असा असू शकतो ऑस्ट्रेलियाचा संघ

टिम पेन (कर्णधार, यष्टीरक्षक), जो बर्न्स, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशाने, मॅथ्यू वेड, जोश हेजलवुड, मायकेल नासर, नॅथन लायन, जेम्स पॅटिनसन आणि मिशेल स्टार्क.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

12 ते 16 डिसेंबर, पर्थ येथे पहिला कसोटी सामना (दिवस- रात्र)

26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना

3 ते 7  जानेवारी, सिडनी येथे तिसरा कसोटी सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---