आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात २१ वा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ ३०० पेक्षा जास्त धावा फलकावर लावू शकला असता. परंतु त्यांना २७१ धावांवरच रोखण्यात ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनर हिने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने सामन्यादरम्यान एक शानदार झेल पकडत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला स्वस्तात बाद केले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. दक्षिण आफ्रिकेला सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. परंतु आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर शेवटी मिग्नॉन डु प्रीज (Mignon Du Preeze) ताबडतोब फलंदाजीसाठी उपलब्ध होती. तिने १३ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा करत ती वेगाने संघाचा धावफलकही पुढे नेत होती.
मात्र तिने ४६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळला आणि हाच फटका तिला महागात पडला. तिने चौकारासाठी फटका मारला आणि तिथे सीमारेषेजवळ उभा असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनरने (Ashleigh Gardner) तिला इराद्यावर पाणी फेरले. तिने मागच्या बाजूला हवेत उडी मारत एका हाताने चटकन चेंडू पकडला. तिने इतक्या वेगाने आणि सहज तो झेल टिपला की, तीदेखील तिच्या झेलमुळे अचंबित झाली होती. आयसीसीने तिच्या या षटकाराचा व्हिडिओ पोस्ट करत तिच्या झेलचे कौतुक केले आहे.
Ash Gardner what a catch! 🤯 #CWC22 pic.twitter.com/kW2LGXJ9LF
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) March 22, 2022
https://www.instagram.com/reel/CbYySDklPJl/?utm_source=ig_web_copy_link
झेलव्यतिरिक्त गार्डनरने एक विकेटही घेतली
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाचा झेल टिपण्याव्यतिरिक्त ऍश्ले गार्डनरने एक विकेटही घेतली. तिने सामन्यादरम्यान १० षटके गोलंदाजी करताना ५२ धावा देत १ महत्त्वपूर्ण विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर लॉरा वॉलवार्ड हिला तिने तहिला मॅकग्राथच्या हातून ९० धावांवर झेलबाद केले होते.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर २७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ ४५.२ षटकांमध्ये ५ विकेट्सच्या गमावत दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य पूर्ण केले आणि ५ विकेट्स शिल्लक असताना सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशवरील विजयानंतर भारताची टॉप-३मध्ये उडी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अशी आहेत गणिते
सलग १८ पराभवांनंतर पाकिस्तानने चाखला विजयाचा स्वाद, कर्णधाराने मुलीसोबत साजरा केला आनंद