ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे शनिवार(२६ डिसेंबर) पासून खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार असल्याने बॉक्सिंग डे कसोटी म्हणूनही संबोधला जात आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी अंतिम ११ जणांचा कसा असेल, याबाबत माहिती दिली आहे.
अंतिम ११ संघात बदल नाही
लँगर यांनी स्पष्ट केले आहे की बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल होणार नाही, म्हणजेच ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळलेल्या सर्व ११ खेळाडूंना दुसऱ्या सामन्यासाठीही संघात स्थान मिळेल. लँगर म्हणाले की जर संघात बदल करायचा असेल तर तुम्हाला खुप धैर्यवान व्हावे लागेल.
तसेच लँगर म्हणाले, जर पुढील दोन दिवसात कोणालाही दुखापत झाली नाही तर ऑस्ट्रेलिया संघात बदल होण्याची चिन्हे नाहीत.
वॉर्नर या सामन्यातून बाहेर
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर दुसऱ्या कसोटीला देखील मुकणार आहे. त्याला भारताविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना मांडीची दुखापत झाली होती. अजून तो त्या दुखापतीतून सावरत आहे.
वॉर्नर दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नाही म्हणजेच ऑस्ट्रेलियाकडून जो बर्न्स आणि मॅथ्यू वेडलाच सलामी जोडी म्हणून दुसऱ्या कसोटीत खेळावे लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोव्हस्की देखील दुखापतग्रस्त आहे. त्याला भारताविरुद्ध सराव सामना खेळताना डोक्याला चेंडू लागला होता. त्यामुळे तो आधीच दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता.
असा आहे बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य ११ जणांचा संघ –
जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक)), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवुड.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : राशिद खानच्या केवळ ४ चेंडूवर ‘या’ गोलंदाजाने फटकाविल्या तब्बल १५ धावा
‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’, माजी दिग्गजाची टीका
‘लाल चेंडूने भारताला होईल फायदा’, माजी खेळाडूचे वक्तव्य