भारत-ऑस्ट्रेलिया संघात बाॅर्डर-गावसकर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या 6 विकेट्सवर 141 धावा अशी आहे. भारतीय संघाची आघाडी 145 धावांवर पोहोचली आहे. वास्तविक, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केलं, मात्र यष्टीरक्षक फलंदाज ‘रिषभ पंत’ने (Rishabh Pant) शानदार खेळी केली.
पंतने 33 चेंडूत 61 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 6 चौकारांसह 4 षटकार लगावले. या वादळी खेळीनंतर पंत सतत चर्चेत आहे. त्यावर आता ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी रिषभ पंतच्या फलंदाजीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) म्हणाले की, “पहिल्या डावात रिषभ पंतने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटले, पंतची ही नैसर्गिक शैली नव्हती. आपल्या फलंदाजीने विरोधी गोलंदाजांना पटकन दबावात आणण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. याची झलक दुसऱ्या डावात पाहायला मिळाली. पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरूद्ध शानदार फलंदाजी केली.”
सिडनी कसोटीचा तिसरा दिवस संपल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) नाबाद परतले. याआधी पहिल्या डावात भारतीय संघ 185 धावांवरच गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 181 धावा केल्या. अशा प्रकारे भारतीय संघाला 4 धावांची आघाडी मिळाली. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची धावसंख्या 6 विकेट्सवर 141 अशी आहे. भारताची आघाडी 145 धावांवर पोहोचली आहे.
रिषभ पंतच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2018 साली कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 42 कसोटी सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने 41.86च्या सरासरीने फलंदाजी करताना 2,847 धावा केल्या आहेत. पंतने कसोटीत 14 अर्धशतकांसह 6 शतके झळकावली आहेत. कसोटीत त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धनश्रीसोबत घटस्फोट झाला, तर चहलला किती प्रॉपर्टी द्यावी लागेल?
सिडनी कसोटीत किती धावा डिफेंड करू शकते टीम इंडिया? तिसऱ्याच दिवशी मिळणार सामन्याचा निकाल?
चहल-धनश्रीच्या नात्यात दुरावा? सोशल मीडियावर उचललं मोठं पाऊल; आता घटस्फोट निश्चित!