गुरुवारी(5 सप्टेंबर) वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 178 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि एलिसा हेलीने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
हेलीने 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 122 धावांची खेळी केली. तर लेनिंगने 145 चेंडूत 121 धावांची खेळी केली. यात तिने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. याबरोबरच कर्णधार लेनिंगने एक खास विश्वविक्रम रचला आहे.
लेनिंगचे हे वनडे कारकिर्दीत 76 डावात खेळताना केलेले 13 वे शतक आहे. त्यामुळे ती महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये सर्वात जलद 13 वनडे शतके करणारी क्रिकेटपटू ठरली आहे.
तिने हा विश्वविक्रम करताना दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाला मागे टाकले आहे. अमलाने 13 शतके 83 वनडे डावात केले होते.
या यादीत लेनिंग आणि अमलाच्या पाठोपाठ संयुक्तरित्या भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटॉन डीकॉक आहे. या दोघांनीही प्रत्येकी 86 वनडे डावात 13 शतके केली होती.
महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारी क्रिकेटपटू –
लेनिंग महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारी क्रिकेटपटू आहे. आत्तापर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूला 13 वनडे शतके करता आलेली नाही. त्यामुळे लेनिंग 13 वनडे शतके करणारी पहिलीच पहिला क्रिकेटपटू ठरली आहे.
गुरुवारी पार पडलेल्या वेस्ट इंडीज महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील सामन्यात ऑस्ट्रेलिया महिलांनी लेनिंग आणि हेलीच्या शतकांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 308 धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडीज महिलांसमोर विजयासाठी 309 धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज महिलांना 37.3 षटकात सर्वबाद 130 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून केवळ कर्णधार स्टिफनी टेलरने नाबाद 70 धावांची खेळी करत एकाकी झूंज दिली.
#वनडेमध्ये सर्वात जलद 13 शतके करणारे क्रिकेटपटू (महिला आणि पुरुष क्रिकेटपटू मिळून) –
76 डाव – मेग लेनिंग
83 डाव – हाशिम अमला
86 डाव – विराट कोहली
86 डाव – क्विंटॉन डी कॉक
91 डाव – डेव्हिड वॉर्नर
99 डाव – शिखर धवन
#महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटू –
13 शतके – मेग लेनिंग (ऑस्ट्रेलिया)
10 शतके – सुझी बेट्स (न्यूझीलंड)
9 शतके – शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)
8 शतके – क्लेअर टेलर (इंग्लंड)
8 शतके – कारेल रोल्टॉन (ऑस्ट्रेलिया)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडीयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ व्या वनडेत शानदार विजय मिळत मालिकाही जिंकली
–…म्हणून विंडीज विरुद्ध अश्विन ऐवजी जडेजाला मिळाली संधी, कोहलीने केला खूलासा
–भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन, पहा व्हिडिओ