पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) 2024 नुकतेच संपले, परंतु, पुढील ऑलिम्पिक खेळांबद्दलची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये वाढू लागली आहे. कारण 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्या ऑलिम्पिकमध्ये टी20 फॉरमॅट क्रिकेट खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी आता ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) या विषयावर मोठं वक्तव्य केलं.
2024च्या टी20 विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशा परिस्थितीत 35 वर्षीय स्मिथ क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटलाही अलविदा म्हणू शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. पण आता ऑलिम्पिकमध्ये खेळण्यावर तो म्हणाला, “मी कदाचित 4 वर्षांनंतरही टी20 क्रिकेटचा भाग असेल. जगात बरेच फ्रेंचायझी क्रिकेट खेळले जात आहे आणि मी नुकताच सिडनी सिक्सर्सशी 3 वर्षांचा करार केला आहे. ऑलिम्पिक त्यानंतर 1 वर्षानं आहे. ऑलिम्पिकचा भाग बनणे हा एक अविस्मरणीय क्षण असेल.”
1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. परंतु, संघांच्या कमकुवतपणामुळे क्रिकेट ऑलिम्पिक खेळांतून बाहेर पडले. 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. अमेरिकेतील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी 2024 मधील टी20 विश्वचषकात 20 संघांचा समावेश करण्यात आला होता.
स्टीव्ह स्मिथचं (Steve Smith) वय सध्या 35 वर्ष 79 दिवस आहे. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 109 कसोटी, 158 एकदिवसीय आणि 67 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 109 कसोटी सामन्यात त्यानं 56.97च्या स्ट्राईक रेटनं 9,685 धावा केल्या आहेत. 158 एकदिवसीय सामन्यात त्यानं 43.91च्या सरासरीनं 5,446 धावा केल्या आहेत, तर 67 टी20 सामन्यात 1,094 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 44 शतक झळकावली आहेत, तर 79 अर्धशतकं देखील ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘काला चष्मा’ गाण्यावर 2 ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या मनू भाकरचा भन्नाट डान्स
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू