ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका ऑस्ट्रेलिया येथे सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच हा पंचांना शिविगाळ करताना दिसला. त्याचा आवाज स्टम्पच्या माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. त्याच्या या कृत्याने त्याला ताकीद देण्यात आली आहे. मोठ्या धावसंख्येच्या या सामन्यात यजमान संघ 8 विकेट्सने पराभूत झाला. यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 208 धावसंख्या उभारली, तर ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 200 धावांपर्यंतच मजल गाठू शकला.
ही घटना इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना 9व्या षटकात घडली. कॅमेरून ग्रीन याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोस बटलर याने अप्परकट मारला, मात्र तो चेंडू विकेटकीपर मॅथ्यू वेड याने उत्तमरित्या झेल घेतला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कॅच असल्याची अपील केली, मात्र पंचांनी स्पष्टपणे नकार दिला. जेव्हा ऍरॉन फिंच (Aaron Finch) आणि खेळाडू डीआरएसची चर्चा करत होते तेव्हा वेळ निघून गेली होती. त्यानंतर फिंच पंचाशीच हुज्जत घालताना दिसला. तेव्हा त्याने शिवीगाळ केली यामुळे त्याने आयसीसीच्या नियमातील आचार संहितेच्या स्तर एकचे उल्लंघन केले.
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला खेळाडूंसोबत आणि खेळाडूंचे समर्थन करणाऱ्या आयसीसी आचार संहिता 2.3 या नियामाचे उल्लंघन केले. फिंचने त्याची चूक मान्य केली असून त्याला एक डिमेरिट पॉइंटही मिळाल. मागील 24 महिन्यांमधील फिंचची ही पहिलीच चूक होती, ज्यामुळे त्याच्यावर निर्बंध लादले जाणार नाही. तसेच इंग्लंडविरुद्द सुरू असलेल्या या मालिकेबरोबरच टी20 विश्वचषकासमोर तो आपल्यावर संकटे ओढवून घेणार नाही.
क्रिकेटच्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांच्या आत 4 किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्याचे रूपांतर एका निलंबन पाइंटमध्ये होते आणि तसे झाले तर त्या खेळाडूवर काही सामन्यांची बंदी घातली जाते.
"It would have been f***ing nice to know in time."
Aaron Finch swearing at the umpire against England, after asking whether a ball had carried to Matthew Wade as he considered a review. Finch has been given an official reprimand by the match referee, but avoided a fine. pic.twitter.com/Pm3AR1VmaR
— Jack Snape (@jacksongs) October 10, 2022
बटलरने त्या चेंडूनंतर चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. त्या सामन्यात त्याने 32 चेंडूत 68 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती तेव्हा वेड याने विकेट वाचवण्यासाठी मार्क वूड याला धक्का दिला होता. ते बरे की, इंग्लंडने पंचाकडे काही अपील केले नाही. यामुळे वेड आऊट होता होता वाचला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता गोलंदाजांची खैर नाही, विराटला मिळाली 48 आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या दिग्गजाची साथ
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर