---Advertisement---

AUSvSA: द्रविडच्या 19 वर्षांपूर्वीच्या कृतीची पॅट कमिन्सकडून पुनरावृत्ती! उस्मान ख्वाजाचा ‘स्वप्नभंग’

Usman Khawaja & Pat Cummins
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA)यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. यावेळी सामन्याच्या चौथ्या दिवशी कसोटीमध्ये 19 वर्षापूर्वी झालेली घटना परत घडली आहे. झाले असे की, सामन्याचे केवळ पहिले दोनच दिवस खेळ झाला. तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्याने एकही चेंडू न टाकता तो दिवस संपूर्णपणे वाया गेला. चौथ्या दिवशी तरी द्विशतक पूर्ण होईल या आशेवर असणाऱ्या उस्मान ख्वाजा याची निराशा झाली.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) हा या सामन्यात 195 धावांवर नाबाद होता. तो चौथ्या दिवशी द्विशतक पूर्ण करेल अशी आशा असताना कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने डाव घोषित केला. यामुळे ख्वाजा 195 धावांवर नाबाद राहिला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 4 विकेट्सवर 475 असा राहिला. कमिन्सच्या या निर्णयाने चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

https://twitter.com/SSanwar87/status/1611610239865962496?s=20&t=UES2Ewbyi0yvht0u32bj3A

ख्वाजासोबत जे झाले त्यावरून 2004मध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत घडलेला क्षण आठवला. मार्च 2004मध्ये भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. मुल्तानमध्ये झालेल्या कसोटीत विरेंद्र सेहवाग याने पहिल्या डावात त्रिशतक केले आणि सचिन 194 धावांवर खेळत होता. नेमके त्याचक्षणी त्यावेळचा कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) याने डाव घोषित केला. द्रविडच्या त्या निर्णयामुळे लोकांनी खूप टीका केली होती. आता तसेच ख्वाजासोबत झाले आहे.

ख्वाजाचे हे द्विशतक झाले असते, तर ते त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेच द्विशतक ठरले असते. तो मागील 12 महिन्यांपासून चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर लागोपाठ तीन कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. तो जेव्हापासून संघात परतला आहे तेव्हापासून त्याने 5 कसोटी शतके केली आहेत. त्याचबरोबर त्याला आयसीसीने पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी देखील नामांकित केले आहे.

या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. आता त्यांचे दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्या सामन्यतही त्यांचेच वर्चस्व आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Tata Open Maharashtra Tennis: एकेरीत टॅलन ग्रीक्सपूर, बेंजामिन बोन्झी यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---