---Advertisement---

टीम इंडियाने ४ षटकांच्या आतच आॅस्ट्रेलियाला दिले दोन धक्के

On: शुक्रवार, नोव्हेंबर 23, 2018 1:54 PM
---Advertisement---

मेलबर्न। आज(23 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम श्रेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून आॅस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

या सामन्यात आॅस्ट्रेलियाला पहिला धक्का सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बसला आहे. त्यांचा कर्णधार एॅरॉन फिंचला भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बाद केले.

भुवनेश्वरने थोडा वाईडला चेंडू टाकून फिंचला फटका मारण्यास भाग पाडले. पण चेंडू फिंचच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक रिषभ पंतकडे गेला. पंतनेही चूक न करता योग्य झेल घेतला.

तसेच त्यानंतर चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भारताचा गोलंदाज खलील अहमदने ख्रिस लिनला बाद करत आॅस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. लिनचा झेल अष्टपैलू कृणाल पंड्याने घेतला.

या सामन्यात भारताने 11 जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तर आॅस्ट्रेलियाच्या संघात एक बदल करण्यात आलेला आहे. त्यांनी दुखापतग्रस्त बिली स्टॅनलेक ऐवजी नॅथन कुल्टर नाइलला संघात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

टाॅस का बाॅस- जो रुटचा टाॅस जिंकण्यात अजब कारनामा

ISL 2018: ब्लास्टर्सला चकवून आगेकूच करण्यास नॉर्थइस्ट उत्सुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment