वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून त्यातील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे गुरूवारी (1 डिसेंबर) स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशेन यांनी शतकी खेळी करत संघाला 550 धावसंख्येच्या पुढे नेले. यावेळी स्मिथने शतक करताच सर डॉन ब्रॅडमन यांच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध शतक हे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याचे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 29वे शतक ठरले. याबरोबर त्याचेन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्यांमध्ये रिकी पॉंटिंग पहिल्या स्थानावर आहे. त्याने 41 शतके केली आहेत. याच यादीत स्मिथने ब्रॅडमन यांची बरोबरी केली. ब्रॅडमन यांनी 29 कसोटी शतके केली. मात्र या यादीत स्मिथ पाचव्या स्थानावर आहे, तर ब्रॅडमन चौथ्या स्थानावर आहे. कारण 29 कसोटी शतके करण्यासाठी ब्रॅडमन यांनी 52 सामने खेळले तर स्मिथने 88 सामने खेळले.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्यांमध्ये स्टीव्ह वॉ 32 शतकांसह दुसऱ्या आणि मॅथ्यू बेडन 30 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत 3 बाद 574 धावसंख्या केली. यावेळी स्मिथ 301 चेंडूत 190 धावा आणि ट्रेविस हेड 83 चेंडूत 86 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित होते.
त्याचबरोबर सध्याच्या घडीला सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) 28 शतकांसह दुसऱ्या आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 27 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) 24 शतकांसह चौथ्या स्थानावर आहे.
Steve Smith notches up Test century number 29!
Australia turn the screws in Perth 👀
Watch #AUSvWI on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺
Scorecard: https://t.co/GmPHL3FnGN pic.twitter.com/WfJa6iZ9Ok
— ICC (@ICC) December 1, 2022
भारत लवकरच बांगलादेशचा दौरा करणार असून दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यामध्ये विराट चांगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे. तसेच फॅब फोरमध्ये (विराट, स्टीव्ह, केन, जो) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्यांमध्ये विराट 71 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या स्पर्धेचा भाग आहे. AUSvWI: Steve Smith equals Sir Don Bradman Record after century, Virat Kohli slips to third place
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारे खेळाडू-
71- रिकी पॉंटिंग
32 – स्टिव्ह वॉ
30 – मॅथ्यू हेडन
29 – सर डॉन ब्रॅडमन
29 – स्टीव्ह स्मिथ*
पहिल्या 155 डावांत सर्वाधिक कसोटी शतके करणारे खेळाडू-
29: डॉन ब्रॅडमन
29 : सचिन तेंडुलकर
29: स्टीव्ह स्मिथ*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दर्जा! टी20 विश्वचषकात विराटने मारलेल्या ‘त्या’ दोन षटकारांचे पाकिस्तानी खेळाडूनेही केले कौतुक
VIDEO: पोलंडविरुद्ध पेनल्टी ‘मिस!’ विश्वचषकात मेस्सीचा नकोसा, तर गोलकिपरच्या नावावर भन्नाट रेकॉर्ड