हॅमिल्टनच्या सेडन पार्क स्टेडियमवर शनिवारी (०५ मार्च) आयसीसी महिला विश्वचषकातील तिसरा सामना (ICC Women World Cup) पार पडला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUSW vs ENGW) या संघांमध्ये हा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३१० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २९८ धावांवरच गारद झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनसन (Jess Jonassen) हिने एक अप्रतिम झेल (Jess Jonassen One Hand Catch) टिपला, ज्याला पाहून ती स्वत:सुद्धा चकित झाली होती.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाने सलामीवीर रिचल हायनेसच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि मेग लॅनिंगच्या ८६ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने ३१० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. सलामीवीर टॅमी बॉमाट हिने ७४ धावांची तुफानी खेळी केली. तर कर्णधार हिथर नाईट हिनेही झटपट ४० धावा जोडल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाज मिळूनही शतकवीर नताली स्किव्हरला बाद करू शकल्या नाहीत.
मात्र इंग्लंडच्या मधळ्या आणि खालच्या फळीतील इतर फलंदाजांना कमी धावांवर रोखण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज यशस्वी ठरल्या. त्यातही कॅथरीन ब्रंटला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची गोलंदाज जोनासनने अप्रतिम झेल टिपला. ती डावातील ५० वे षटक टाकण्यासाठी आली असताना तिच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कॅथरीनने जोरदार फटका मारला. परंतु तिने मारलेल्या शॉटचा चेंडू हवेत जास्त उंचावर जाऊ शकला नाही. त्यावेळी नॉन स्ट्राईकर एंडकडे उभी असलेली गोलंदाज जोनासनने चपळता दाखवत त्वरित चेंडू पकडला. विशेष म्हणजे तिने फक्त एका हाताने हा झेल घेतला.
https://www.instagram.com/reel/CatxEDTlLHd/?utm_source=ig_web_copy_link
तिच्या या अनपेक्षित आणि भन्नाट झेलला पाहून फलंदाजही चकित झाली होती. तसेच स्वत जोनासनने आपल्या झेलवर आश्चर्य व्यक्त केले होते. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हीदेखील जोनासनच्या झेलने आनंदी झाल्याची पाहायला मिळाली. याबरोबरच समालोचकही तिच्या झेलचे कौतुक करताना दिसले. आयसीसीने जोनासनच्या या शानदार एकहाती झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! ब्रँडीच्या बॉटलमुळे सुरू झाला होता महिला क्रिकेटचा ‘विश्वचषक’, खूपच रंजक आहे कहाणी
बीसीसीआयने ‘हे’ पाऊल उचलले, तर सुरेश रैना नाही खेळू शकणार आयपीएल २०२२
भारत-पाकिस्तान विश्वचषकात आमने सामने, पण गोलंदाजी प्रदर्शन ‘मिताली अन् संघा’ला आणणार गोत्यात!