ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेसोबत खेळत आहे. शनिवारी (10 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका संपली. 2-1 अशा अंतराने यजमान ऑस्ट्रेलियाने मालिका नावावर केली. तिसऱ्या कसोटीत एक अशी घटना घडली, जी क्रिकेटजगतात चर्चेचा विषय बनली आहे.
उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना शनिवारी नॉर्थ सिडनीमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सच्या नुकसानावर 277 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका महिला संघ 24.3 षटकात अवघ्या 127 धावा करून सर्वबाद झाला. ताहलिया मॅकग्रा सामनावीर ठरली. तिने फलंदाजी करताना 44 धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीच्या रुपात तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. 110 धावांच्या अंतराने ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीला आल्यानंतर अष्टपैलू अलाना किंग हिच्यासोबत एग गमतीशीर प्रकार घडला. 28 वर्षीय अलाना एका फुलटॉस चेंडूवर षटकार मारला आणि याच चेंडूवर ती हिटविकेट देखील झाली. चेंडू मारल्यानंतर स्वतःवरील नियंत्रण तिला राखता आले नाही आणि तिची बॅट स्टंप्सला लागली. पण पंचांनी तरीही तिला बाद घोषित केले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Alana King manages to hit a six – and her own wicket – off the same ball!
It’s all happening! #AUSvSA pic.twitter.com/PrsVvkNvL0
— cricket.com.au (@cricketcomau) February 10, 2024
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 48व्या षटकात हा प्रकार घडला. मसाबाता कलास याषटकात गोलंदाजी करत होती. षटकातील शेवटच्या चेंडूवर अलानाने हा षटकार मारला. ऑस्ट्रेलियासाठी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला अलाना 12चेंडूत 17 धावांची खेळी करू शकली. यात दोन षटकारांचा समावेश होता. आधीचा चेंडू नो बॉल असल्यामुळे पुढच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला फ्री हीट मिळाली. अलानाने फ्री हिटच्या या चेंडूवर देखील षटकार मारला. म्हणजे एकाच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला दोन षटकारांचे 12 आणि नो बॉलची एक अशा 13 धावा मिळाल्या. (AUSW vs SAW. A unique incident happened in the third ODI match! Australia got 13 runs off one ball)
महत्वाच्या बातम्या –
INDU19 vs AUSU19 Final : रोहित, कोहली आणि शमीचा बदला घेणार उदय; अन् भारत 84 दिवसांनी विश्वचषक जिंकणार…
INDU19 vs AUSU19 Final : रोहित, कोहली आणि शमीचा बदला घेणार उदय; अन् भारत 84 दिवसांनी विश्वचषक जिंकणार…






