आयपीएल 2021 मधील 13 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल या संघात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांशी चर्चा करतानाचे काही फोटो व्हायरल झाले. या दरम्यानच्या एका फोटोला चाहत्यांकडून बरीच पसंती मिळाली, तो फोटो दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खान आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा होता.
सामना संपल्यानंतर आवेश खानने रोहितकडून आपल्या दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीवर त्याची स्वाक्षरी घेतली होती. या क्षणांचे फोटो सध्या व्हायरल बोक आहेत. हा क्षण टीपलेले काही फोटो दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही शेअर केले आहेत. रोहित शर्मा आणि अवेश खान या दोघांचा फोटो पोस्ट करताना त्याखाली “सामन्यानंतर आवेश खानमधील चाहता बाहेर आला आहे”, असे कॅप्शन दिल्लीने लिहिले आहे.
The fanboy in Avesh Khan had to come out after the match ✍🏼🤗#YehHaiNayiDilli #DCvMI #IPL2021 pic.twitter.com/Qfp32SwUS8
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2021
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. आयपीएल 2020 मधील विजेता मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 13 व्या सत्रात दिल्ली कॅपिटल्सचा पाच वेळा पराभव केला होता.
मात्र यंदा या सामन्यात अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राने मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून उच्च धावसंख्या करण्यापासून रोखले आणि आवेश खानने शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत त्याला सुरेख साथ दिली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात विजय मिळवला.
A tale of two cities, friendships and so much more, everytime we play 💙#YehHaiNayiDilli #DCvMI #IPL2021 pic.twitter.com/AVSy9fy3Rn
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2021
या सामन्याबाबत बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सऩे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्माने सोडता कोणात्याही खेळाडूला मोठी खेळी साकरता आली नाही आणि पुन्हा एकदा मुंबईची मधली फळी अपयशी ठरली. रोहित शर्माच्या 44 धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 138 केल्या.
यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राने मुंबईच्या 4 फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून बाद केले. त्याने आपल्या चार षटकांत 24 धावा देऊन चार बळी घेतले. तसेच आवेश खान आणि ललित यादव यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. यामध्ये आवेश खानने 15 धावा देऊन 2 तर ललित यादवने 17 धावा देऊन 1 बळी मिळवला.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघातील सलामीवीर शिखर धवन 45 आणि स्टीव्ह स्मिथ 33 यांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे दिल्लीनेे 19.1 षटकांत चार गडी गमावून 138 धावा करत मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर
प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”
चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम