---Advertisement---

LSG vs RR: लखनऊच्या विजयाचा सूत्रधार ठरला ‘हा’ खेळाडू, शेवटच्या क्षणी सामना फिरवला

On: रविवार, एप्रिल 20, 2025 7:37 AM
---Advertisement---

लखनऊ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या होत्या, नंतर धावांचा पाठलाग करताना राजस्थान 20 षटकात 178 धावा करू शकला आणि दोन धावांच्या थोडक्या अंतराने त्यांना हा सामना गमवावा लागला. लखनऊच्या विजयाचा खरा सूत्रधार आवेश खान ठरला. ज्याने शेवटच्या षटकात यशस्वी जयस्वाल सहित तीन फलंदाजांना बाद केले.

राजस्थान रॉयल्सला 181 धावांचं आव्हान मिळालं होतं. ज्याचा पाठलाग करताना त्यांनी दमदार सुरुवात केली होती. वैभव सूर्यवंशीने त्याच्या आयपीएल पदार्पण सामन्यात जोरदार फलंदाजी करत 20 चेंडूत 34 धावांची पारी खेळली. यशस्वी जयस्वाल सोबत त्याने 85 धावांची चांगली भागीदारी रचली होती.

यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रियान परागने 62 धावांची भागीदारी रचली आणि राजस्थानच्या जिंकण्याच्या आशा वाढवल्या, पण यादरम्यान त्यांच्या दोन विकेट्स पडल्या. जयस्वाल 74 धावा करून तसेच रियान पराग 39 धावा करून बाद झाला.

लखनऊच्या विजयाचा खरा सूत्रधार आवेश खान ठरला, कारण त्याने शेवटच्या काही षटकात तीन विकेट्स घेतल्या आणि सामना तिथेच पलटवला. त्याने 18 व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने यशस्वी जयस्वालला बाद केले, तसेच याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रियान परागला देखील बाद केले. तसेच विसाव्या षटकात शिमरॉन हेटमायर राजस्थानच्या विजयाची एक आशा होता, पण आवेश खानने त्याला देखील परत पाठवले. आणि लखनऊला शानदार विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---