रांची | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१९ वर्षात केवळ वनडेत ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. ९ सामन्यात त्याने ६२.५०च्या सरासरीने ५०० धावा केल्या आहे.
विराटने या ९ सामन्यात २ शतकं आणि १ अर्धशतकं केलं आहे. यात ४२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.
यावर्षी वनडे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राॅस टेलर अव्वल स्थानी आहे. त्याने ११ सामन्यात ७४.१२च्या सरासरीने ५९३ धावा केल्या आहेत.
विराटने यावर्षी पहिला वनडे सामना १२ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. त्यानंतर त्याने कामगिरीत चांगलेच सातत्य राखले आहे.
यावर्षी खेळलेल्या ९ सामन्यात त्याने ३, १०४, ४६, ४५, ४३, ६०, ४४, ११६ आणि आजच्या नाबाद ४५ अशा धावा केल्या आहेत.
यावर्षीची जर प्रत्येक दिवसाची सरासरी काढली तर विराटने प्रत्येक दिवशी जवळपास ७.४६ धावा केल्या आहेत. विराटच्या पुढे या सरासरीत केवळ राॅस टेलर आहे.
भारतीय विश्वचषकात कमीतकमी ९ तर जास्तीत जास्त ११ सामने खेळणार आहे. तर सध्या सुरु असलेल्या मालिकेत अजूनही २ सामने बाकी आहे. त्यामुळे विराटला १४ जूलै पर्यंत कमीतकमी ११ तर जास्तीत जास्त १३ सामने खेळायला मिळण्याची संधी आहे. त्यामुळे यावर्षी जुलैपर्यंतच विराटकडून १ हजारपेक्षा जास्त धावा होण्याची शक्यता आहे.