दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु सराव सत्रादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आणि आशिया चषकातून त्याला माघार घ्यावी लागील. जडेजा आशिया चषकातून बाहेर होण्यामागे त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत कारणीभूत असल्याचे सांगितले गेले. पण अशातच आता त्याच्या दुखापतीविषयी मोठी माहिती मसोर आली आहे. दुखापतीमुळे जडेजा आगामी टी-20 विश्वचषकात देखील खेळणार नाहीये. जडेजाला झालेल्या या दुखापतीविषयी समोर आलेली नवीन माहिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येकाला धक्का बसत आहे.
यावर्षी होणारा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे आशिया चषकापाठोपाठ आगामी टी-20 विश्वचषकातून देखील बाहेर झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने माहिती दिली गेली आहे की, आशिया चषकादरम्यान जडेजाला एक अशी एक्टीविटी करायला लावली गेली, जी बीसीसीआयचा भाग नाहीये. अशात त्याला झालेल्या दुखापतीमुळे अनेक अंदाज बांधले जात आहेत. वृत्तांनुसार भारतीय संघ आशिया चषक 2022 मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याठिकाणी त्याला पाण्याशी संबंधित एक सराव करायला सांगितला गेला. बीसीसीआयच्या नियमांमध्ये असा कोणताही सराव नसताना देखील जडेजाला हा सरवा का करायला लावला? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) पाण्याशी संबंधित सराव करताना घसरला आणि खाली पडला. याच वेळी त्याचा गुडघा मुडपला होता. आता ही दुखापत गंभीर झाली असून जडेजाने यावर शस्त्रक्रिया देखील केली आहे. दरम्यान, जडेजाने आशिया चषकातील ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने खेळले आहेत. पाकिस्तानविरुद्ध 35 धावा केल्या होत्या आणि एकही विकेट घेऊ शकला नव्हता. तसेच हाँगकाँगविरुद्ध खेळताना 15 धावा खर्च करून 1 विकेट घेतली होती. हाँगकाँगविरुद्ध खेळताना त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हता. आगामी टी-20 विश्वचषकात जडेजा भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकत होता, परंतु आता तो या महत्वाच्या स्पर्धेत खेळणार नाहीये. विश्वचषकादरम्यान भारतीय संघाला जडेजाची कमी जाणवू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुलिप ट्रॉफी 2022: यशस्वी जयसवालचे फर्स्ट ‘क्लास’ द्विशतक, कॅप्टन रहाणेही दिसला फॉर्ममध्ये
VIDEO | हे काय? पाकिस्तानी चाहत्यांची कुटाई केली, पण भारतीयांच्या गळ्यात पडून सामना पाहत होते अफगाणी चाहते
अमित मिश्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अभिनेत्रीला पडला महागात, गोलंदाजाने दिलयं चोख प्रत्युत्तर