टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षरची पत्नी मेहा हिनं मुलाला जन्म दिला. अक्षरनं मंगळवारी (24 डिसेंबर) संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली.
अक्षर आणि मेहा यांच्या मुलाचा जन्म 19 डिसेंबरला झाला. अक्षरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या मुलानं टीम इंडियाची जर्सी घातलेली दिसत आहे. मात्र त्यानं आपल्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. अक्षरनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “तो अजूनही त्याच्या पायानं ऑफ साइड शोधत आहे. परंतु टीम इंडियाच्या जर्सीमध्ये तुम्हा सर्वांना त्याची ओळख करून देण्यासाठी आम्ही थांबू शकत नाही. भारतातील सर्वात लहान, तरीही सर्वात मोठा चाहता आणि आमच्या हृदयाचा तुकडा असलेल्या हक्श पटेलचं स्वागत आहे.” या पोस्टवरून कळतं की, अक्षर आणि मेहा यांनी त्यांच्या मुलाचं नाव हक्श पटेल ठेवलं आहे.
अक्षर आणि मेहा यांचे लग्न जानेवारी 2023 मध्ये झाले होते. या दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक होती. अक्षर आणि मेहा यांचं लग्न गुजरातच्या वडोदरात झालं. या दोघांनी 2022 मध्ये एंगेजमेंट केली होती. आता मेहानं मुलाला जन्म दिला आहे.
30 वर्षीय अक्षर पटेल भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. तो 2024 टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग होता. फिरकीपटू आर अश्विनच्या निवृत्तीनंतर त्याला बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवलं जाईल असं बोललं जात होतं. मात्र अक्षरनं मुलाच्या जन्मामुळे मायदेशी राहण्याचा निर्णय घेतला. आता त्याची आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात निवड होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया कधी मैदानात उतरणार? येथे होणार पाकिस्तानशी सामना; सर्वकाही जाणून घ्या
IND vs AUS; “रोहित शुबमनला बोलव…” सरावादरम्यान चाहत्याने केली कर्णधारालाच विनंती! व्हायरल VIDEO एकदा पाहाच
मोठी बातमी: आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! या दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान मुकाबला