भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे पहिला कसोटी सामना सुरू असून या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२७ नोव्हेंबर) भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. १२९ धावांपासून पुढे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केलेल्या न्यूझीलंडला पुढे धक्क्यानंतर धक्के बसत गेले आणि १४२.३ षटकांमध्ये २९६ धावांवर न्यूझीलंडचा संघ सर्वबाद झाला. त्यामुळे यजमान भारताने पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतली.
न्यूझीलंडला २९६ धावांवर रोखण्यात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल याचा मोठा वाटा राहिला. त्याने या डावात ५ विकेट्स हॉल (एका डावात ५ विकेट्स) मोठे विक्रम केले आहेत.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३४ षटके गोलंदाजी करताना ६२ धावा देत त्याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. यामध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम, रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम ब्लंडल आणि टीम साउदी यांचा समावेश आहे. अक्षरने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ५ विकेट्स घेण्याची ही पाचवी वेळ आहे. यासह पहिल्या ४ कसोटीत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स हॉल घेणारा तो भारतातील पहिला आणि जगातील चौथा गोलंदाज बनला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1464536429774585856?s=20
तसेच सर्वात कमी कसोटी डावात ५ विकेट्स हॉल घेण्याची किमयाही त्याने केली आहे. विशेष बाब अशी की, अक्षरव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. त्याने केवळ ७ कसोटी डावांमध्ये ५ वेळा ५ विकेट्स हॉल घेतले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ५ पाच विकेट्स हॉल घेणारे गोलंदाज:
६ – रॉडनी हॉग
७ – चार्ली टर्नर
७ – टॉम रिचर्डसन
७ – अक्षर पटेल*
पहिल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा ५ विकेट्स हॉल घेणारे गोलंदाज:
६ – चार्ली टर्नर
५ – टॉम रिचर्डसन
५ – रॉडनी हॉग
५ – अक्षर पटेल*
दरम्यान भारताच्या ३४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून सलामीवीर टॉम लॅथमने सर्वाधिक ९५ धावा फटकावल्या. त्याला सलामीवीर विल यंग याची साथ मिळाली. यंगने ८९ धावांचे योगदान दिले. या २ सलामीवीरांना वगळता न्यूझीलंडकडून इतर कोणालाही साजेशी खेळी करता आली नाही. परिणामी २९६ धावांवर न्यूझीलंडचा संघ गारद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुभवी अश्विनपेक्षाही एक पाऊल पुढे निघाला अक्षर! केवळ ४ कसोटीत ‘इतक्या’ विकेट्स घेत ठरला वरचढ
‘तर भारत मायदेशात डीआरएस वापरावर बंदी आणू शकतो’, न्यूझीलंडच्या अष्टपैलूने घेतली फिरकी