अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. हा सामना दिवस-रात्र सामना असून यात भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने अफलातून कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावातही त्याने ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. दरम्यान, त्याने एक खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारताला पहिल्या डावात १४५ धावांवर सर्वबाद केल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. मात्र इंग्लंडच्या डावाची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रावलीला शुन्यावर त्रिफळाचीत केले. त्यामुळे तो कसोटीमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट्स घेणारा जगातील चौथाच तर भारताचा दुसराच फिरकीपटू ठरला आहे.
याआधी असा विक्रम भारताकडून आर अश्विनने केला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात रॉरी बर्न्सला पहिल्याच चेंडूवर पॅव्हिलियनमध्ये धाडले होते. त्याआधी जवळपास १०० वर्षांपूर्वी १९८८ साली बॉबी पील यांनी कसोटी सामन्यातील डावाच्या पहिल्याच चेंडूवर ऍलेक बॅनरमन यांना बाद करत सर्वात आधी असा कारनामा केला होता. त्यांच्यानंतर १९०७ साली अल्बर्ट वॉग्लर यांनी टॉम हेवर्ड यांना डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद करत दुसऱ्यांदा हा विक्रम केला होता.
अक्षरच्या ५ विकेट्स
अक्षरने अहमदाबाद कसोटीत दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात जॅक क्रावली आणि जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने डॉमनिक सिब्ली, जो रुट आणि बेन फोक्स यांना बाद करत या डावातील ५ विकेट्स पूर्ण केल्या. त्याने पहिल्या डावातही ६ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे हे अक्षरचे घरचे मैदान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : अक्षर पटेलच्या फिरकी जाळ्यात अडकला इंग्लिश सलामीवीर, रिषभ पंतने घेतला शानदार झेल
आर अश्विन @४००! आर्चरला बाद करताच झाला ‘या’ दिग्गजाच्या यादीत सामील
द्विशतक एक विक्रम अनेक! पृथ्वी शॉने ऐतिहासिक खेळी करत मिळवले दिग्गजाच्या यादीत स्थान