भारतीय संघ रविवारी (दि. 17 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल हा दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर पडला असून, त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने अधिकृत ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
बांगलादेशविरुद्ध अक्षर पटेलची कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या सुपर 4 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यात अक्षर पटेल याने 34 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. त्याने यादरम्यान 2 षटकार आणि 3 चौकारही मारले होते. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नव्हता. या खेळी दरम्यान त्याला दोनदा दुखापत झाली. त्यामुळे या अंतिम सामन्यात तो सहभागी होऊ शकणार नाही.
दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदर अलीकडेच आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग होता. त्याने आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2 सामने खेळले होते. मात्र, दोन सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. सुंदर आयपीएल 2023 स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो दीर्घ काळ क्रिकेटपासून दूर होता. आता सुंदर श्रीलंकेत पोहोचला असून, तो अंतिम सामन्यात खेळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Axar Patel has been ruled out of the Asia Cup2023 final Washington Sundar Replace Him
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक भारतासाठी महत्वाचा कशामुळे? शुमबन गिलने वर्ल्डकपशी जोडला संबंध
वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला ‘440 व्होल्टचा झटका’, नसीम शाह आख्ख्या स्पर्धेतून बाहेर!






