---Advertisement---

अक्षर पटेलने वाढवले रवींद्र जडेजाचे टेंशन! सामन्यानंतरचे जड्डूचे ट्वीट व्हायरल

On: शुक्रवार, जानेवारी 13, 2023 2:26 PM
Ravindra Jadeja & Axar Patel
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा हा दुखापतीमुळे मागील अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना आशिया चषकात खेळला होता. जी स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळली गेली. त्यानंतर त्याला दुखापत झाली यामुळे त्याची जागा कोण घेणार? याचा शोधाशोध सुरू झाला, कारण जडेजा गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही अधिक चांगला आहे. कमी वेळातच अक्षर पटेलने संधीचे सोने करत जडेजाची कमी भरून काढली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत अप्रतिम क्षेत्ररक्षण करत जडेजाची चिंता वाढवली, असा निष्कर्ष काढला जात आहे ज्याला कारणीभूत जडेजाचेच ट्वीट आहे.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) दुसरा वनडे सामना संपल्यावर एक ट्वीट केले. ज्यामध्ये लिहिले, ‘काही बोलू नका, केवळ हसत राहा.’ चाहत्यांनी त्याचा संबंध अक्षर पटेल (Axar Patel) याच्याशी जोडला आहे. काहींचे म्हणणे आहे की जडेजा लवकरच संघात नाही परतला तर पटेलची जागा कायम होईल.

पटेलने चाहत्यांना निराश न करता मागील अनेक सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. ज्यामुळे संघाने विजय मिळवले. दुसरीकडे जडेजा आशिया चषकानंतर खेळलाच नाही. दुखापतीमुळे त्याला 2022च्या टी20 विश्वचषकासही मुकावे लागले होते. तेव्हा पटेलला संधी मिळाली होती, मात्र त्याला 5 सामन्यात 3 विकेट्स घेता आल्या. तसेच जडेजाला बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी निवडले होते, मात्र पूर्णपणे फिट न झाल्याने त्याने माघार घेतली. त्या दौऱ्यात पटेलने चांगली कामगिरी केली होती.

पटेलला टी20 विश्वचषकात साजेशी कामगिरी नाही करता आली, मात्र त्याने पुढील तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली. म्हणूनच त्याला सतत तिन्ही प्रकारामध्ये खेळणे शक्य झाले. घरच्या मैदानावर सुरू असलेल्या मालिकांमध्ये पटेलने श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यात खेळताना 147 धावा केल्या आणि 4 विकेट्सही घेतले. त्याचबरोबर त्याने उत्तम क्षेत्ररक्षणही केले.
(Axar Patel increased Ravindra Jadeja’s tension his tweet after INDvSL 2nd ODI went viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकी विश्वचषक 2023: भारत विरुद्ध स्पेन सामना कुठे पाहणार? संघ, रेकॉर्ड्स जाणून घ्या एकाच क्लिकवर
राहुलच्या ‘मॅचविनिंग’ खेळीचे रोहितकडून कौतुक, मात्र संघनिवडीबाबत कॅप्टनचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---