अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू झाला असून यजमानांची पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाहुण्यांचा भारतीय गोलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. पहिल्या सत्राखेर इंग्लंडने २६ षटकात ३ बाद ७४ धावा फलकावर नोंदवल्या. दरम्यान फिरकीपटू अक्षरने इंग्लंडची सलामी जोडी बाद करत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
त्याचे झाले असे की, कर्णधार जो रूटने डॉम सिब्ली आणि झॅक क्राउले यांना सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर पाठवले. या सलामी जोडीकडून इंग्लंडला मोठ्या भागिदारीची अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनीही सावधानपणे डावाची सुरुवात केली. परंतु फिरकी गोलंदाज अक्षरने डावातील आपले पहिलेच षटक टाकायला आल्यानंतर अवघ्या २ धावांवर सिब्लीची दांडी उडवली.
एवढेच नव्हे तर, पुढे डावातील ७.५ षटकात केवळ ९ धावांवर त्याने दुसरा सलामीवीर क्राउलेला मोहम्मदच्या सिराजच्या हातून झेलबाद केले. अशाकप्रकारे अक्षरने इंग्लंडच्या सलामी जोडीला दोन आकडी धावा करायच्या तंबूत धाडले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या फिरकीपटूने पहिल्याच डावात विरोधी संघाच्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांना एकेरी धावसंख्येवर बाद करण्याची ही पहिलीच वेळ होती.
मागील ३ डावात पहिल्याच षटकात घेतली विकेट
याबरोबरच चौथ्या सामन्यातील आपल्या षटकात सिब्लीला बाद करत अक्षरने मोठा पराक्रम केला आहे. यापुर्वीच्या तिसऱ्या सामन्यातील दोन्ही डावात आपल्या पहिल्याच षटकात त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत फसवले होते. अशाप्रकारे सलग ३ डावातील स्वत:च्या पहिल्या षटकात विकेट घेण्याचा कारनामा त्याने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 4th Test Live: इंग्लंडचे आघाडीचे ४ फलंदाज तंबूत, सिराजने बेयरस्टोला धाडलं तंबूत
चौथ्या कसोटीत कोहली आणि स्टोक्समध्ये शाब्दिक बाचाबाची, पाहा व्हिडिओ
अक्षरच्या घातक फिरकीने इंग्लंडच्या सलामीवीराची उडाली दांडी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल