18व्या इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) नवीन कर्णधाराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली हा एकमेव संघ आहे ज्यांनी आतापर्यंत आपल्या कर्णधाराची घोषणा केली नाही. अलिकडेच अशी बातमी आली होती की केएल राहुल किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला दिल्ली संघाची कमान सोपवली जाईल.
आता एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचे नेतृत्व करणार आहे. पटेलने काही आयपीएल सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे, परंतु संपूर्ण हंगाम त्याने कधीही संघाचे नेतृत्व केलेले नाही.
आयएएनएसच्या अहवालानुसार, अक्षर पटेलला लवकरच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. (Axar Patel Captain Delhi Capitals) आयएएनएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने ती ऑफर नाकारली आहे.
सूत्रांनी सांगितले की, “आयपीएल 2025 साठी अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. फ्रँचायझीने केएल राहुलला कर्णधारपदाबद्दल विचारले होते, परंतु तो आगामी स्पर्धेत कर्णधार म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून दिल्लीच्या कामगिरीत योगदान देऊ इच्छितो.”
केएल राहुलला आयपीएलमध्ये 2 संघांचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याने 2020 आणि 2021 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले, परंतु दोन्ही हंगामात पंजाबला गुणतालिकेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याच वेळी, 2022-2024 पर्यंत, त्याने लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) जबाबदारी स्वीकारली आणि संघाला दोनदा प्लेऑफमध्ये नेले.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025: पुष्पा स्टाईलमध्ये रवींद्र जडेजाची चेन्नईच्या ताफ्यात एँट्री..! VIDEO
बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळले जाणार ‘हे’ 3 खेळाडू
IPL 2025: LSGला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर