वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) झालेला दुसरा वनडे सामना चित्तथरारक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारताला ३१२ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना २ चेंडू शिल्लक ठेवून भारताने २ विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयाचा शिल्पकार राहिला अक्षर पटेल. अक्षरने गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत धुव्वादार खेळी करत संघाला मालिका जिंकून दिली. त्यातही त्याने शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण ठरला.
या सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies vs India) प्रथम फलंदाजी करताना शाय होपच्या शतकी खेळीच्या जोरावर ३११ धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनीही टिच्चून फलंदाजी केली. वेस्ट इंडिजच्या ३१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून वरच्या फळीत श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले. १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ६३ धावांची खेळी केली. तसेच सलामीवीर शुबमन गिलनेही ४३ धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) (५४ धावा) अर्धशतक करून बाद झाला.
त्यानंतर खालच्या फळीत अक्षर पटेलने (Axar Patel) महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आक्रमक पवित्रा घेत ३५ चेंडूत नाबाद ६४ धावांची झंझावाती खेळी केली. अखेरच्या ५० व्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी ८ धावांची गरज होती. सुरुवातीच्या ३ चेंडूंवर त्याने आणि सिराजने मिळून फक्त २ धावा जोडल्या. त्यानंतर विजयासाठी ३ चेंडूत ६ धावा अशी स्थिती निर्माण झाली.
https://twitter.com/ashishk53254023/status/1551336970994868224?s=20&t=DiSECzut5qfVngtVYAmqWg
अशावेळी चौथ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या अक्षरने कायले मेयर्सच्या चेंडूचा आणि वेस्ट इंडिजने लावलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेतला. मेयर्सने आऊटसाईड ऑफला खालून फुल टॉस टाकला. या चेंडूला अक्षरने लॉन्ग ऑफच्या वरून टोलवले आणि षटकारासाठी पाठवले. त्याच्या या मॅच विनिंग षटकाराचा चेंडू सामीरेषेबाहेर जाऊन पडला. अक्षरच्या या नेत्रदीपक षटकाराची (Axar Patel Match Winning Six) सोशल मीडियावर चर्चा होत आहे. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! वनडे मालिका जिंकूनही भारताच्या ताफ्यात निराशेची लहर, झालंय मोठं नुकसान
वेस्ट इंडिजला झुकवत भारताने मिळवला ‘नंबर १’चा ताज, खास विश्वविक्रमात पाकिस्तानला टाकले मागे
शंभराव्या सामन्यात होपचा शतकी धमाका! रिचर्ड्सपासून रोहितला सोडले मागे