भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला असून, भारतीय संघाकडे विजयाची संधी असेल. चौथ्या दिवशी विराट कोहलीसह अष्टपैलू अक्षर पटेल याने भारताच्या डावात महत्त्वाचे योगदान दिले. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तोच पत्रकारांना सामोरा गेला. त्यावेळी त्याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्या समीक्षकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले.
चौथ्या दिवसाच्या खेळात अक्षर पटेल याचे भारतीय संघासाठी महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. विराट कोहलीसह त्याने सहाव्या गड्यासाठी तब्बल 162 धावांची भागीदारी रचली. यादरम्यान त्याने मालिकेतील आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले. तो 79 धावा करून बाद झाला.
चौथ्या दिवसानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने भारतीय संघाकडून हजेरी लावली. यावेळी त्याला खेळपट्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,
“मला वाटते याकडे लक्ष द्यायला नको. कारण पहिले तीन सामने तीन दिवसांमध्ये संपले तेव्हा देखील टीका करण्यात आली. आता सामना पाचव्या दिवशी गेला आहे तरी देखील लोक खुश नाहीत. लोकांना हे चकित करणारे वाटते. या गोष्टी आपल्या हातात नाहीत.”
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या 480 धावांच्या प्रतिउत्तरात भारतीय फलंदाजांनी देखील सडेतोड उत्तर दिले. सलामीवीर शुबमन गिलने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक पूर्ण करताना 128 धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहलीने खेळाची सूत्रे आपल्याकडे घेतली. तीन वर्षांपेक्षा अधिकच्या कालावधीनंतर त्याने कसोटी शतक झळकावले. अक्षर पटेलने अर्धशतक करत त्याला साथ दिली. विराटने 186 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 91 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
(Axar Patel Slams People Who Talk About Ahmedabad Test Pitch After Day 4)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लंडची नाचक्की! दुबळ्या बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यासह केली टी20 मालिका नावे
जोड्या जबरदस्त! टीम इंडियाच्या फलंदाजांनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास, 90 वर्षात प्रथमच असं घडलं





