बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. अक्षरनं मंगळवारी सोशल मीडियावर त्याच्या मुलाची झलक शेअर केली. फोटोत बाळानं टीम इंडियाची जर्सी घातलेली दिसत आहे. अक्षरनं बाळाचा एक सुंदर फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो त्याच्या आई-वडिलांचा हात धरून दिसत आहे.
अक्षर पटेलनं आपल्या पहिल्या बाळाचं नाव ‘हक्ष’ असं ठेवलंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नावाचा अर्थ काय आहे? या नावाचा विराट कोहली आणि रोहित शर्माच्या मुलाच्या नावांशी काय संबंध आहे? तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
हक्षचा जन्म 19 डिसेंबरला झाला. तो अक्षर आणि त्याची पत्नी मेहा यांचं पहिलं अपत्य आहे. या जोडप्याचं लग्न जानेवारी 2023 मध्ये झालं होतं. फिरकीपटू आर अश्विनच्या निवृत्तीनंतर बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या उर्वरित सामन्यांसाठी अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश होईल असं बोललं जात होतं. परंतु अक्षरच्या घरी बाळाचं आगमन होणार असल्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या जागी मुंबईचा अष्टपैलू तनुष कोटियनला संधी मिळाली आहे.
हक्ष या नावाचा अर्थ सर्वसाधारणपणे डोळा असा होतो. त्याला ‘दृष्टी’ असंही म्हणता येईल. हे नाव हिंदू पुराणांतून आलं आहे. ‘हक्ष’ हे नाव भगवान शिवाला उद्देशून म्हटलं जातं. विशेष म्हणजे, विराट कोहलीनं आपल्या मुलाचं ‘अकाय’ हे नाव देखील भगवान शिवाच्या नावावर ठेवलं आहे. तर रोहित शर्मानं त्याच्या मुलाचं नाव ‘अहान’ आणि जसप्रीत बुमराहनं त्याच्या मुलाचं नाव ‘अंगद’ ठेवलं आहे. ही तिन्ही नावं हिंदू पुराणांतून आलेली आहेत.
हेही वाचा –
वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेटपटू बनला पिता, पत्नीने दिला मुलाला जन्म
विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंत, 5 क्रिकेटपटू ज्यांच्या घरी यावर्षी पाळणा हलला
मिशेल स्टार्क या खास रेकॉर्डपासून फक्त 5 विकेट दूर, लवकरच होणार महान खेळाडूंच्या क्लबमध्ये एंट्री!