मुंबई । त्रिपुरा राज्यातील 19 वर्षाखालील महिला क्रिकेटर अयंती रेंग हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. अयंतीचा मंगळवारी रात्री राहत्या घरातल्या खोलीतील छतास लटकलेला मृतदेह आढळून आला. तिच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. तसेच तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही.
ती मूळची अगरताळा पासून नव्वद किलोमीटर दूर असलेल्या रिंग गावची रहिवासी होती. अयंती तिच्या कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी होती. अयंतीच्या मृत्यूनंतर त्रिपुरा क्रिकेट संघटनेचे सचिव तिमिर चंदा यांनी दुःख व्यक्त करत म्हटले की, “आमचा संघ एका प्रतिभाशाली महिला क्रिकेटपटूला मुकला. अयंतीने 16 वर्षांखालील राज्याच्या संघात खेळली होती. ती खूपच चांगली खेळाडू होती. तिच्या निधनाची बातमी कळताच आम्हा सर्वांना धक्का बसला. तिच्या परिवारात कोणत्या अडचणी आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नाही.”
अयंतीने 19 वर्षाखालील संघात चांगली कामगिरी केल्यानंतर तिला राज्याच्या 23 वर्षांखालील एज ग्रुपच्या टी 20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. मानसिक ताणतणावामुळे तिने जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
लॉकडाऊनमध्ये ताणतणाव आल्याने अनेक जण आत्महत्या करत असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्याने देखील ताणतणावामुळे आत्महत्या केले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ट्रेंडिग घडामोडी –
मोठी बातमी: ७ वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत या संघाकडून पुनरागमन करण्यास सज्ज
४ धावा देत ६ विकेट्स टीम इंडियाकडून घेण्याच्या ऐतिहासिक कामगिरीला झाली ६ वर्ष
बीसीसीआय आयसीसीतील तणाव वाढला! टी२० विश्वचषकावरुन सुरु झालेत वाद