पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सुरू आहे. या स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळताना सध्या आझम खान याची (Azam Khan) फलंदाजी चांगलीच बहरताना दिसत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्त्व केलेल्या मोईन खान यांचा आझम खान मुलगा आहे. त्याने गुरुवारी (३ फेब्रुवारी) क्वेटा ग्लाडिएटर्स विरुद्ध खेळताना आक्रमक अर्धशतक केले आहे.
आझम खानची धुंवाधार फलंदाजी
गुरुवारी झालेल्या सामन्यात इस्लामाबाद संघाने प्रथम फलंदाजी केली. या संघाकडून आझम ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याच्या येण्यापूर्वी संघ २० षटाकत १८० धावांपर्यंत पोहचेल असे वाटत होते. मात्र, त्याने केलेल्या तुफीनी फटकेबाजीमुळे इस्लामाबादने २० षटाकात ४ बाद २२९ धावा केल्या.
आझमने ३५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ६ षटकार मारले. या खेळीदरम्यान आझमने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीविरुद्ध (Shahid Afridi) चांगलीच आक्रमक फलंदाजी केली. त्याने त्याच्या एकाच षटकात तीन षटकार ठोकले. हे षटकार त्याने २० व्या षटकात मारले. विशेष म्हणजे याच षटकाच्या ५ व्या चेंडूवर आझमला आफ्रिदीने त्रिफळाचीत करत माघारी धाडले. पण, तोपर्यंत इस्लामाबादने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता.
https://www.instagram.com/p/CZhX8x8KRm_/
आझम व्यतिरिक्त या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुन्रोने देखील ताबडतोड फलंदाजी केली. त्याने इस्लामाबादकडून खेळताना ३९ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या. त्याने ५ षटकारांपैकी २ षटकार आफ्रिदीच्या गोलंदाजीविरुद्ध मारले.
https://www.instagram.com/p/CZhQkHUK2bq/
त्यामुळे शाहिद आफ्रिदी ग्लॅडिएटर्सला चांगलाच महागात पडला. त्याने ४ षटाकात १६.७५ च्या इकोनॉमी रेटने ६७ धावा दिल्या. यादरम्यान त्याला केवळ आझमची विकेट घेण्यात यश आले.
https://www.instagram.com/p/CZhYjqYKyTu/
दरम्यान, २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लॅडिएटर्सला १९.३ षटकात सर्वबाद १८६ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून एहसान अलीने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद नवाजने ४७ आणि जेम्स फॉकनरने नाबाद ३० धावांची खेळी केली. याशिवाय कोणाला खास काही करता आले नाही. इस्लामाबादकडून शदाब खानने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी खेळाडूंचा नादखुळा! झेल तर सोडलाच नंतर एकमेकांना दिली जबर धडक – व्हिडिओ
एकाच सामन्यात शतकही अन् ५ विकेट्सही! पाकिस्तानच्या कर्णधाराचा विश्वचषकात कहर कारनामा