पाकिस्तान संघाचा माजी विकेटकीपर मोईन खानचा मुलगा आजम खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी२ सामन्यातून पदार्पण केले. पहिल्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना आझमने नाबाद ५ धावा केल्या. त्याने चौकारांसह आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. मात्र, तरीही तो सोशल मीडियावर त्याच्या वजनामुळे प्रचंड ट्रोल झाला.
पहिल्याच सामन्यात झाला ट्रोल
आजम खान हा स्थानिक क्रिकेटमध्ये बेधडक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण आपल्या वजनामुळे बऱ्याचचा चर्चेत असतो. पाकिस्ताचे वृत्तपत्र डॉनच्या म्हणण्यानुसार, आझम खानने तब्बल ३० किलो वजन गेल्या १२ महिन्यात कमी केले आहे. आझमचे पूर्वीचे वजन 140 किलो होते. पाकिस्तान संघात जागा मिळाल्याने वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले, असे आझमचे मत आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत खिल्ली उडवली.
What excellent running between the wickets by Azam Khan ❤️ pic.twitter.com/ZpXiEkWOsP
— ???????????????????????? ???????????????????????? (@_Notyourbro) July 17, 2021
https://twitter.com/adil786123/status/1416113200148398087
Hafeez Bhai is looking young and more fit than Azam Khan.
It seems Azam have put on some weight… pic.twitter.com/REznmsRFWF— Mariya Rajput (@mariya_raj10) July 12, 2021
https://twitter.com/Pak_Cricketer7/status/1414917192852852737
Azam khan running between the wickets looks very cute ????#ENGvsPAK #T20I pic.twitter.com/MZrhLtT9Ak
— noman kundi (@nomankhan4814) July 16, 2021
ठरला ५ वा खेळाडू
आझम खान हा राष्ट्रीय संघात खेळणारा ५ वा पाकिस्तानी खेळाडू आहे, ज्याचे वडील देखील क्रिकेटपटू आहेत. यापूर्वी पाकिस्तानसाठी नझर मोहम्मद-मुद्सर नजर, हनीफ मोहम्मद-शोएब मोहम्मद, मजीद खान-बाजीद खान, अब्दुल कादिर-उस्मान कादिर या वडील मुलांच्या जोड्या पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळल्या आहेत.
पाकिस्तान ने जिंकली पाहिला टी२० सामना
पहिल्या टी२० सामन्यात पाकिस्तानने ३१ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ६ बाद २३२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान (६३) आणि बाबर आझम (८५) या सलामीवीरांच्या जोडीने १५० धावांची भागीदारी केली होती. इंग्लंडकडून टॉम करनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाकडून सुरुवात फारशी बरी झाली नाही. इंग्लंडने पहील्या ७ षटकात ४ गडी गमावले. पण लियाम लिव्हिंग्स्टोनने ४३ चेंडूंत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०३ धावा काढून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. पण तो 17 व्या षटकात बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ १९.२ षटकांत २०१ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चर्चा तर होणारच! संघ हरला, पण नागवराच्या सेलिब्रेशनने वेधले सर्वांचेच लक्ष, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या रसेलचा गोलंदाजीत राडा; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित
पुन्हा खेळणार का कसोटी क्रिकेट? भुवनेश्वर कुमारने दिले ‘हे’ उत्तर