पुणे। जनादेश संघाने पीएमपी संघाला तर मेट्रोइट्स संघाने ए के स्पोर्ट्स संघाला पराभूत करतना आझम महिला क्रिकेट टी-२० स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीत जनादेश संघाने पीएमपी संघाला ३६ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना जनादेश संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १३७ धावा केल्या. सलामीवीर तेजल हसबनीस हिने आक्रमक फलंदाजी करताना ३९ चेंडूत ९ चौकारांच्या सहाय्याने ४८ धावांची खेळी केली. तुला भूमिका उंबरजे हिने १५ (३ चौकार) तर आरती सुनील हिने १४ (१ चौकार) तर काश्मीरा शिंदे हिने १२ (१ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. प्रिया कोकारेने १८ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. वैष्णवी काळे, रसिका शिंदे, तेजस्विनी दुरागड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
पीएमपी संघाला जनादेश संघाने दिलेले आव्हान पेलवले नाही. पीएमपी संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १०१ धावाच करू शकला. पीएमपी संघाकडून अंबिका वाटाडे हिने ४२ चेंडूत ३३ (४ चौकार) धावांची खेळी केली. तिला वैष्णवी काळेने १९ (२ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली, मात्र त्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. भूमिका उंबरजेने २ तर श्रुती महाबळेश्वर, प्राजक्ता कुंभार व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. जनादेश संघाच्या तेजल हसबनीसला सामानावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या लढतीमध्ये मेट्रोइट्स संघाने ए के स्पोर्ट्स संघाला ८१ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मेट्रोइट्स संघाने पूर्वा भईडकर व संजूला नाईक यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ५ बाद १४५ धावा केल्या. पूर्वा भईडकरने आक्रमक फलंदाजी करताना १७ चेंडूत ३ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने ३१ तर संजूला नाईकने ३० चेंडूत ५ चौकारांच्या सहाय्याने ३२ धावांची खेळी केली. पूर्वजा वारलेकरने १९ (३ चौकार), इब्तीसम शेखने १७ (२ चौकार), दीक्षा आमोणकरने १६ (२ चौकार) धावा केल्या. खुशी मुल्लाने २, अदिती जोशी, महेक मुल्ला व अनन्या दर्शाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
उत्तरार्धात ए के स्पोर्ट्स संघाला १८.३ षटकांत सर्वाबाद ६१ धावाच करता आल्या. महेक मुल्लाने सर्वाधिक ३१ (४३ चेंडू, ४ चौकार) धावा करताना एकाकी लढत दिली. संजूला नाईक व सोनाली शिंदे यांनी प्रत्येकी २ तर स्वंजली मुळे व पूर्वा भईडकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ३२ धावांची खेळी व २ गडी बाद करणाऱ्या मेट्रोइट्सच्या संजूला नाईकला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
नॅशनल ड्यूटीमुळे शाकिब आयपीएल लिलावात राहिला अनसोल्ड? पत्नीने सांगितले खरे कारण
टेनिस क्रिकेटचा बादशाह खेळणार केकेआरसाठी; केवळ १० चेंडूत ठोकलेय अर्धशतक
रोहितने पाठराखण केल्यानंतर आता फलंदाजी प्रशिक्षकांनी विराट कोहलीच्या फॉर्म बद्दल केले मोठे वक्तव्य