---Advertisement---

पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत ऍझटेक्स, गनर्स, ग्लॅडिएटर्स संघांची विजयी सलामी

On: मंगळवार, फेब्रुवारी 19, 2019 8:30 AM
---Advertisement---

पुणे। ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत गोयल गंगा ग्रुप ऍझटेक्स, युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स, रावेतकर हाऊसिंग ग्लॅडिएटर्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

बावधन येथील गंगा लिजेंड्स फुटबॉल मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अनिकेत गुप्ता व शुभम गायकवाड यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर गोयल गंगा ग्रुप ऍझटेक्स संघाने चिताज नाईट्सचा 2-0 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात शुभम फटघन याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स संघाने हिलयॉस अँड क्लोरेस्टोल क्लिनिक्स सेंच्युरियन्सचा 1-0 असा सनसनाटी पराभव केला. रावेतकर हाऊसिंग ग्लॅडिएटर्स संघाने गोल्डफिल्ड रेंजर्स संघावर 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. विजयी संघाकडून रोहिथ जयसिंघानी, सुमेध सपकाळ यांनी प्रत्येकी एक गोल केला.

चुरशीच्या झालेल्या लढतीत द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स संघाने केएसएच बोल्ट्स संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. एमपीग्रुप मावरिक्स व टीआरएनए इंडियन पॅलॅडियन्स यांच्यातील सामना गोलशून्यबरोबरीत सुटला. याआधी स्पर्धेचे उदघाटन लॉयला स्कुलचे मिलिंद क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ऋषिकेश बारावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एमपीग्रुप मावरिक्स: 0 बरोबरी वि. टीआरएनए इंडियन पॅलॅडियन्स: 0;

फायरबर्डस: 0 बरोबरी वि. एसएस रॉय अँड असोसिएट्स वायकिंगस्: 0;

गोयल गंगा ग्रुप ऍझटेक्स: 2(अनिकेत गुप्ता 2मि., शुभम गायकवाड 12मि.)वि.वि.चिताज नाईट्स: 0;

द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स: 1(धीरेन भतिजा 7मि.)बरोबरी वि.केएसएच बोल्ट्स: 1(शुभम गायकवाड 15मि.);

युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स: 1(शुभम फटघन 9मि.)वि.वि. हिलयॉस अँड क्लोरेस्टोल क्लिनिक्स सेंच्युरियन्स: 0;

निओट्रीक रेझरबॅक्स: 0 बरोबरी वि.पुनीत बालन स्पार्टन्स: 0;

रावेतकर हाऊसिंग ग्लॅडिएटर्स: 2(रोहिथ जयसिंघानी 4मि., सुमेध सपकाळ 10मि.)वि.वि. गोल्डफिल्ड रेंजर्स: 0.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment