टी२० विश्वचषकाचा ३१ वा सामना मंगळवारी (२ नोव्हेंबर) अबू धाबी येथे पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून १८९ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान ७९ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार बाबर आझमने ७० धावांची खेळी खेळली. दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तान संघासाठी उत्कृष्ट सलामी देत विजयाचा पाया रचला.
या सोबतच बाबर आणि रिझवान या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शतकीय भागीदारी करण्याचा विक्रमही केला आहे.
पाकिस्तान संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी नामिबिया विरुद्ध खेळताना ११३ धावांची मोठी सलामी दिली. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक वेळा शतकीय भागीदारी करण्याचा विक्रम आता बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावे नोंदवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या जोडीने पाच वेळा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये अशी कामगिरी बजावली आहे.
दुसऱ्या स्थानी भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी आहे. दोघांनी चार वेळा शतकी भागीदारी केली आहे. न्यूझीलंडची केन विलियम्सन आणि मार्टिन गप्टील ही जोडीही संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनीही आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चार वेळा शतकीय भागीदारी रचली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून १८९ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान ७९ धावांवर नाबाद राहत महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रिझवानने आपल्या खेळीत आठ चौकार आणि चार षटकार लगावले. कर्णधार बाबर आझमने ७० धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत सात चौकार ठोकले.
त्याचवेळी अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजने १६ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. फकर झमान पाच धावा करून बाद झाला. नामिबियाकडून जेन फ्रीलिंक आणि डेविड वेझ यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतली.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने नामिबियासमोर विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. नामिबियाचा संघ निर्धारित २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावाच करू शकला. नामिबियाकडून डेविड वेसने नाबाद ४३ धावा केल्या. त्याच्याशिवाय क्रेग विल्यम्सने ४० आणि स्टीफन बार्डने २० धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अली, शादाब खान, इमाद वसीम आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अशाप्रकारे, पाकिस्तानने नामिबियाचा ४५ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ब्रेकअप झालाय का?’ शुबमन गिलच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण
टी२०मध्ये बाबर आझम ‘कर्णधार’ विराट कोहलीला ठरतोय सरस, आता ‘या’ विक्रमात दिला धोबीपछाड
‘तो विवियन रिचर्ड्सप्रमाणे विध्वंसक खेळ करतो’, शेन वॉर्नने ‘या’ फलंदाजाचे गायले गोडवे