टी२० विश्वचषकाचा ३१ वा सामना मंगळवारी (२ नोव्हेंबर) अबूधाबी येथे पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून १८९ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान ७९ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार बाबर आझमने ७० धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बाबरने एक विक्रमही नोंदवला आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० कर्णधार म्हणून बाबर आझमने सर्वाधिक वेळा ५० हुन अधिक धावा केल्या आहेत. त्याने आता विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबर आता पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. बाबर आझमने १४ वेळा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये कर्णधार म्हणून ५० हुन अधिक धावांची खेळी खेळली आहे. दुसऱ्या स्थानावर घसरण झालेल्या विराट कोहलीने भारताचा टी२० कर्णधार म्हणून १३ वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची कामगिरी आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये कर्णधार म्हणून ११ वेळा ५० हुन अधिक धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर इंग्लडचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे, त्याने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस याने ८ वेळा अशी कामगिरी बजावली असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून १८९ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान ७९ धावांवर नाबाद राहत महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रिझवानने आपल्या खेळीत आठ चौकार आणि चार षटकार लगावले. कर्णधार बाबर आझमने ७० धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत सात चौकार ठोकले.
त्याचवेळी अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजने १६ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. फखर जमान पाच धावा करून बाद झाला. नामिबियाकडून जेन फ्रीलिंक आणि डेविड वेझ यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतली.
त्यानंतर १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाने २० षटकात ५ बाद १४४ धावा केल्या. त्यांना निर्धारित षटकात लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आल्याने पाकिस्तान ४५ धावांनी विजयी झाले.
पाकिस्तान आणि नामीबिया संघ पहिल्यांदाच टी२० मध्ये आमने सामने आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो विवियन रिचर्ड्सप्रमाणे विध्वंसक खेळ करतो’, शेन वॉर्नने ‘या’ फलंदाजाचे गायले गोडवे
जॉस बटलरच्या आक्रमक खेळीने बेन स्टोक्सही भलताच प्रभावित; ट्वीट करत म्हटला…
‘टी२० विश्वचषकही आयपीएलसमोर फिका वाटतो,’ सुनिल गावसकरांचे मोठे वक्तव्य