---Advertisement---

सोडला की काढला? बाबर आझम बीबीएलच्या उर्वरित सिझनमधून बाहेर

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 3:21 PM
---Advertisement---

बिग बॅश लीग (बीबीएल) २०२५-२६च्या हंगामात खराब कामगिरीमुळे बाबर आझम संघाबाहेर झाला आहे. तो या स्पर्धेत सिडनी सिक्सर्सकडून खेळतो. संघ सोडल्यामुळे तो सिक्सर्सच्या चॅलेंजर्स आणि संभाव्य अंतिम फेरीसाठी उपलब्ध राहणार नाही. ११ सामन्यात कमी स्ट्राईक रेटने खेळल्याने तो चर्चेत आला होता. यामुळे त्याला संघातून काढले की त्याने स्वत: संघ सोडला या चर्चेला उधाण आले आहे.

काही रिपोर्टसनुसार पाकिस्तान संघासोबत जुळण्यासाठी बाबरने त्याचा बीबीएलचा प्रवास थांबवला असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या या लीगमध्ये बाबरची कामगिरी निराशाजनक राहिली. तसेच त्याला पाकिस्तान क्रिकेटने राष्ट्रीय संघात सहभागी होण्यास बोलावले आहे. यामुळे त्याने स्वत: माघार घेतल्याचे समजते. सध्या तरी पाकिस्तानने टी२० विश्वचषक २०२६साठी संघाची घोषणा केलेली नाही.

बाबरच्या माघार घेण्याने तो बीबीएलच्या महत्वाच्या सामन्यांना मुकणार आहे. यामध्ये सिक्सर्स २३ जानेवारीला होबार्ट हरिकेन्स विरुद्ध चॅलेंजर्स सामना खेळेल. यामधून जो जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचणार आहे. पर्थ स्कॉचर्स अंतिम फेरीत पोहोचला असून तो सामना २५ जानेवारीला खेळला जाणार आहे.

बाबर या स्पर्धेत सिक्सर्ससाठी सलामीवीला फलंदाजी करत होता. त्याने या स्पर्धेतून माघार घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या लीगमधील १६ जानेवारीला सिक्सर्स विरुद्ध थंडर्स या सामन्यानंतर बाबर चर्चेत आला होता. थंडर्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बाबरसोबत स्टिव्ह स्मिथ सलामीला आला. १० षटकानंतर सिक्सर्सची धावसंख्या एकही विकेट न गमावता १०७ होती.

एकीकडे स्मिथ जलद फलंदाजी करत होता, त्याने २७ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या. दुसरीकडे बाबरच्या ३३ चेंडूत ४६ धावा होत्या. त्यावेळी ११व्या षटकात एकेरी धाव घेताना दोघांमध्ये मतभेद झालेले दिसले. स्मिथने त्याला परत पाठवले तेव्हा बाबर नाराज दिसला. त्याच्या पुढच्याच चार चेंडूवर स्मिथने चार षटकार मारले तर बाबर पुढच्या षटकात बाद झाला. बाद झाल्यावर त्याने बॅट आपटत आपला राग व्यक्त केला होता. त्याच्या या प्रकाराचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हा सामना सिक्सर्सने ५ विकेट्सने जिंकला. यामध्ये स्मिथने शतकी खेळी केली होती. तसेच पुढील आठवड्यात पाकिस्तान संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० मालिका खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---