---Advertisement---

लिंबू टिंबू गोलंदाजापुढेही बाबर आझम फ्लॉप! सराव सामन्यात केवळ 20 धावांवर बाद

On: मंगळवार, सप्टेंबर 10, 2024 9:38 PM
Babar-Azam
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज बाबर आझमची फ्लॉप कामगिरी सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आलेली नाही. अलीकडे, तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत वाईटरित्या फ्लॉप झाला आणि आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला सूर गवसताना दिसत नाहीये. पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या चॅम्पियन्स चषकाच्या सराव सामन्यात बाबर आझम स्वस्तात बाद झाला आहे.

बाबर आझम हा चॅम्पियन्स चषकातील स्टॅलियन्स संघाचा भाग आहे या संघाचे नेतृत्व मोहम्मद हरीस करत आहेत. बाबर आझमच्या संघाने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यात भाग घेतला. यावेळी बाबर आझम कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

मात्र, बाबर आझम काही विशेष करू शकला नाही आणि 20 चेंडूत केवळ 20 धावा करून बाद झाला. त्याने एका फिरकीपटूच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. त्याच्या या फ्लॉप शोमुळे पुन्हा एकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. असे असले तरीही, या सराव सामन्यात पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदने मात्र चांगली फलंदाजी केली. त्याने 80 चेंडूत 90 धावा केल्या. तसेच तय्यब ताहिरनेही चमकदार कामगिरी केली.

दरम्यान पाकिस्तान संघाला नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाला 2-0 असा दारूण पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर पीसीबीपासून कर्णधार आणि प्रशिक्षकापर्यंत सर्वांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेटची दुर्दशा लक्षात घेऊन पीसीबीने चॅम्पियन्स चषक नावाची नवीन देशांतर्गत स्पर्धा सुरू केली आहे. पाकिस्तानला जास्तीत जास्त नवीन प्रतिभावान खेळाडू मिळावेत हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा विचार केला तर एकूण पाच संघ यात सहभागी होत आहेत. मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हरीस आणि शादाब खान या खेळाडूंना वेगवेगळ्या संघांचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

हेही वाचा-

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनकडे नंबर 1 गोलंदाज बनण्याची संधी, घ्याव्या लागतील फक्त ‘इतक्या’ विकेट्स

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बनला संघमालक, खरेदी केला ‘या’ टीमचा हिस्सा

ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी, भारताविरुद्ध हा फलंदाज करणार सलामी बाॅर्डर-गावस्कर मालिकेसाठी संघाची नवी चाल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---