पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना मुलतानमध्ये खेळला जात आहे. या कसोटीमध्ये आतापर्यंत फलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व दिसून आलं. पाकिस्तान आणि इंग्लंडनं पहिल्या दोन डावात एकत्रितपणे 1379 धावा केल्या. पाकिस्तानच्या डावात तीन शतकं आली, तर इंग्लंडसाठी हॅरी ब्रूकनं तिहेरी शतक आणि जो रुटनं दुहेरी शतक केलं.
हे सर्व असलं तर, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सपाट खेळपट्टीवर फ्लॉप होत आहे. पहिल्या डावात बाबरनं 30 धावा केल्या, तर दुसर्या डावात त्याला फक्त 5 धावा करता आल्या. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये बाबरची खराब कामगिरी बऱ्याच काळापासून चालू आहे. त्यामुळे आता त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी होत आहे.
मुलतान कसोटी आतापर्यंत गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. परंतु बाबर आझम याचा फायदा घेण्यास अपयशी ठरला. अलीकडेच मर्यादित षटकांचं कर्णधारपद सोडल्यानंतर बाबर फलंदाजीत मोठ्या धावा करताना दिसेल, असं बोललं जात होतं. परंतु अद्यार तसं झालेलं नाही.
बाबरनं पाकिस्तानच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली, पण तो नंतर मोठा स्कोअर करू शकला नाही. तो 71 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. ख्रिस वोक्सनं त्याला पायचित केलं. दुसर्या डावात गॅस अॅटकिन्सननं त्याची विकेट घेतली. तो विकेटमागे झेलबाद झाला.
बाबर आझमनं कसोटीमध्ये शेवटचा मोठा डाव 2022 च्या शेवटी न्यूझीलंडविरुद्ध कराची येथे खेळला होता. त्या सामन्यात त्यानं 161 धावा केल्या होत्या. मात्र तेव्हापासून त्याची खराब कामगिरी चालू आहे. त्या सामन्यापासून बाबर आतापर्यंत कसोटीचे 18 डाव खेळला, ज्यात तो एकदाही 50 धावांचा पल्ला गाठू शकला नाही. या सततच्या खराब कामगिरीमुळे बाबर आझमवर जोरदार टीका केली जात आहे. सोशल मीडियावर त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी चालू आहे.
हेही वाचा –
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या 6 गोलंदाजांचं ‘शतक’, 20 वर्षांनंतर बनला मोठा रेकॉर्ड
4 वर्षांत खोऱ्यानं धावा केल्या, तरीही रुट कोहलीचा हा रेकॉर्ड मोडू शकला नाही!
एका सुवर्ण युगाचा अंत! महान टेनिसपटू राफेल नदालची निवृत्तीची घोषणा