मायदेशात इंग्लंडविरुद्ध 0-3 असा पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला. बाबरवर मागच्या काही दिवसांपासून चौफेर टीका होताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने अनिर्णित राहिले असून उभय संघांतील वनडे मालिका सोमवारी (9 जानेवारी) सुरू होईल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधारपदाविषयी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर बाबर चिडल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघांत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे, तर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले असले, तरी त्याआधी पाकिस्तानने मायदेशात इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तानच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार, अशा चर्चा होऊ लागल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीही बाबरला याविषयी प्रश्न विचारले गेले, ज्यावर तो संतापला.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी बाबर माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आला. पत्रकारांनी बाबरला विचारले की, “मागच्या वर्षी मायदेशातील आकडेवारी खराब असल्यामुळे कसोटी कर्णधारपद सोडण्याचा विचार आहे का?” यावर उत्तर देत बाबर म्हणाल, “मला वाटते आता कसोटी सामने संपले आहेत आणि आता आम्हाला मर्यादित षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे आगामी मालिकांविषयी प्रश्न विचारा.”
Good response from Babar Azam "my job is to play cricket and enjoy it. I don't have to answer anyone or satisfy anybody. I know what my responsibility is. I don't have to make anyone happy, my job is to help Pakistan win" #Cricket pic.twitter.com/vs7s28YPWD
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) January 8, 2023
एवढे होऊन देखील पत्रकार परिषदेत दुसऱ्या एका पत्रकाराने हा मुद्दा लावून धरत पुन्हा प्रश्न विचारला. यावेळी मात्र बाबर संतापल्याचे पाहायला मिळाले. उत्तर देताना बाबार म्हणाला की, “मला स्वतःला कुणापुढे सिद्ध करण्याची गरज नाहीये. मला माहितीये मी काय करत आहे. पाकिस्तान संघासाठी चांगले प्रदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्ही चांगले प्रदर्शन केले आहे आणि न्यूझीलंडविरुद्धही हे प्रदर्शन कायम ठेवू इच्छितो. न्यूझीलंड एक चांगला संघ आहे आणि दोन्ही संघांसाठी ही मालिका कठीण असणार आहे.”
दुसरीकडे पहिल्या वनडे सामन्यापूर्वी केन विलियम्सन देखील माध्यमांशी बोलत होता. विलियम्सनने म्हटल्याप्रमाणे, परिस्थिती पाहून त्यांचा संघ या वनडे मालिकेविषयी रणनीती ठरवेल. न्यूझीलंडचे काही खेलाडू पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा खेळत आहेत. या खेळाडूंसाठी हा नवीन अनुभव असणार आहे. (Babar Azam got angry at a journalist who questioned him about Test captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव |महात्मा गांधी विद्यामंदिर विजेता, नंदादीपला खोखोतही यश
दुर्दैवी अपघातात प्रसिद्ध रेसरचे निधन! पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ