पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 3-0 ने धूळ चारली. दरम्यान तिसऱ्या टी20 सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा रेकाॅर्ड मोडीत काढला. बाबर आता आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता बाबरच्या निशाण्यावर रोहित शर्माचा (Rohit Sharma) रेकाॅर्ड आहे.
बाबर आझमने (Babar Azam) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 28 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली. दरम्यान त्याने उत्कृष्ट 4 चौकार लगावले.
बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,192 धावा आहेत, त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) (4,188 धावा) मागे टाकले आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला. या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) 4,231 धावांसह पहिल्या स्थानी आहे. बाबर रोहितच्या 39 धावांनी मागे आहे.
भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी भारताने 2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे बाबरला रोहितचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा रेकाॅर्ड मोडणे शक्य आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा-
रोहित शर्मा (159 सामने), 4,231 धावा
बाबर आझम (126 सामने), 4,192 धावा
विराट कोहली (125 सामने), 4188 धावा
पॉल स्टर्लिंग (147 सामने), 3,665 धावा
मार्टिन गप्टिल (122 सामने), 3531 धावा
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत सर्वोच्च धावसंख्या करणारे खेळाडू (टाॅप-5)
69 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेटपटू डोपिंगमध्ये दोषी, एका महिन्याच्या बंदीची शिक्षा
ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडणार बाबर आझम! विराट-रोहित सारख्या दिग्गजांना टाकू शकतो मागे