पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने शनिवारी (15 एप्रिल) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. मायदेशात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला असून 2-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार बाबारच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने शनिवारी न्यूझीलंडला 38 धावांनी पराभूत केले. या सामन्यानंतर बाबरच्या हातून भारतीय दिग्गज एमएस धोनी याचा मोठा विक्रम देखील मोडीत निघाला.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये बाबर आझम (Babar Azam) आता संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आपल्या संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली आणि त्याची आकडेवारी देखील अप्रतिम होती. पण टी-20 फॉरमॅटमध्ये बाबर एमएस धोनीवर भारी पडला आहे. धोनीने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 72 टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि त्यातील 41 सामने जिंकले. दुसरीकडे बाबरने मात्र शनिवारी कारकिर्दीतील 68 व्या सामन्यात कर्णधार म्हणून भूमिका पार पाडली. यापैकी 42 सामन्यांमध्ये बाबरने पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) आणि अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगान (Asghar Afghan) संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकांवर होते. पण बाबरने आता या यादीत बाबार देखील सामील झाला आहे. आता मॉर्गन, अफगान आणि बाबार यांच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 42-42 विजय आहेत आणि हे तिघेरी संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. सध्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेत पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध अजून तीन सामने खेळायचे आहेत.
बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने अजून एक सामना जिंकला, तर पाकिस्तान मायदेशीत मालिका नावावर करेलच. पण सोबतच कर्णधार म्हणून सर्वाधिक सर्वाधिक 43 टी-20 विजय देखील मिळवेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना सोमवारी (17 एप्रिल) खेळला जाणार आहे. मालिकेतील चौथा सामना 20, तर पाचवा सामना 24 एप्रिल रोजी खेळला जाईल. (Babar Azam has surpassed MS Dhoni for the most number of wins in T20 International cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्ट्राईक रेटची चर्चा होत असतानाच राहुल ठरला सर्वात वेगवान! ‘या’ यादीत अव्वल नंबर
युवा करन ठरला पंजाबचा 15 वा कर्णधार! दिग्गजांनी वाहिलीये नेतृत्वाची धुरा, वाचा यादी