गुरुवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41 वा सामना पार पडला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे पाकिस्तानसाठी विश्वचषकात मोठे संकट उभ केले आहे. आता सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी त्यांना इंग्लंडला खूपच मोठ्या अंतराने पराभूत करावे लागेल. जे अत्यंत कठीण दिसत आहे. असे असले तरी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला अजूनही आपला संघ ती कामगिरी करून दाखवेल असे वाटते.
चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका सामन्यात न्यूझीलंड संघाने मोठा विजय मिळवल्याने त्यांची उपांत्य फेरीची संधी अधिक वाढली आहे. न्यूझीलंडला मागे टाकून पाकिस्तानला या सेमी फायनलमध्ये जागा मिळवायची असल्यास, त्यांना इंग्लंडवर तब्बल 287 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. तर, धावांचा पाठलाग करताना केवळ 15 चेंडूंमध्ये कोणतेही आव्हान पार करावे लागेल. ही गोष्ट क्रिकेटच्या मैदानावर सहजासहजी घडत नाही.
असे असले तरी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला,
“गोष्टी अजूनही आमच्या हातात आहे. क्रिकेटच्या मैदानावर काहीही घडू शकत. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. आम्हाला पहिली फलंदाजीची संधी मिळाल्यास आणि फखर झमान 25-30 षटके खेळल्यास आम्ही नक्कीच मोठी धावसंख्या उभारु.”
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (England vs Pakistan) संघातील सामना शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड संघ यापूर्वीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, विजय मिळवून 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ते पात्र होतील.
(Babar Azam Hoping They Will Reach Semi Final In ODI World Cup)
हेही वाचा-
दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?