---Advertisement---

“तो मिलियन डॉलरचा खेळाडू”, आर अश्विनने उधळली पाकिस्तानच्या क्रिकेपटूवर स्तुतीसुमने

---Advertisement---

मागील काही महिन्यांमध्ये अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले दिसले. यात आर अश्विनचाही समावेश आहे. त्याने युट्यूबवर ‘डीआरएस विथ ऍश’ असा आपला चॅनेल सुरु केला असून यात वेगवेगळे खेळाडू आत्तापर्यंत उपस्थित राहिले आहेत. नुकतेच त्याच्या चॅनेलवरील १५ व्या भागात पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल-हक उपस्थित होता.

या दरम्यान त्यांनी विविध गोष्टींवर चर्चा केली. याच चर्चेदरम्यान अश्विनने पाकिस्तानच्या युवा कर्णधार बाबर आझमचेही कौतुक केले.

अश्विन म्हणाला की ‘बाबर आझम मिलियन डॉलरचा खेळाडू वाटतो. त्याने इंग्लंडमध्ये धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातही शतक केले आहे. तो जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा त्याला पाहायला मजा येते. त्याची फलंदाजी डोळ्यांना समाधान देते.’

यावर इंझमाम म्हणाला, ‘तो एक दिग्गज खेळाडू आहे. त्याच्याकडे जशी प्रतिभा आहे, त्यापेक्षाही त्याने चांगली कामगिरी करायला हवी. त्याने आत्ताशी ५ वर्षेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, अन्य फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशाच्या शिखरावर येण्यासाठी ७ वर्षे लागतात. मला वाटते अजून बाबरला शिखरावर पोहचणे बाकी आहे. तो येत्या काही वर्षात चांगली कामगिरी करताना दिसेल.

बाबर आझमची आंतरराष्ट्रीय कारकिर्द –

बाबरने २९ कसोटी सामने खेळले असून त्याने यात ५ शतके आणि १५ अर्धशतकांसह २०४५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ७७ वनडे सामन्यात १२ शतके आणि १६ अर्धशतकांसह ५५.९३ च्या सरासरीने ३५८० धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने ४४ सामन्यात १६८१ धावा केल्या असून यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याची अनेकदा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबर तुलना होत असते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘हे’ खेळाडू ठरवतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल, भारताच्या दिग्गजाची भविष्यवाणी

ठरलं! ‘या’ मैदानावर होणार ऑस्ट्रेलिया – भारत पहिला कसोटी सामना

ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेची आतुरता शिगेला! केवळ एका दिवसात संपली ‘या’ सामन्यांची तिकीटे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---