पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शानदार ९१ धावा केल्या. नेदरलँड्सच्या अतुलनीय गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजीला आलेला पाकिस्तानचा संघ अवघ्या २०६ धावांवर गारद झाला. मात्र, धावांचे यंत्र बनलेला बाबर शेवटपर्यंत लढत राहिला. बाबरने आपल्या खेळीदरम्यान अनेक विक्रम केले.
बाबर आझमने मागील १० एकदिवसीय डावात ९ वेळा फिफ्टी प्लस धावा केल्या आहेत. त्याने १० डावात ९३च्या सरासरीने ८३७ धावा केल्या आहेत. त्याने चार शतके आणि पाच अर्धशतके केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट ९५च्या आसपास आहे.
बाबरचे मागील १० डाव – १५८(१३९), ५७(७२), ११४(८३), १०५*(११५), १०३(१०७), ७७(९३), १(३), ७४(८५), ५७(६५) , ९१(१२५).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला विश्रांती कशाला?’ माजी दिग्गजाने बीसीसीआयला फटकारले