---Advertisement---

‘क्या कोहली बनेगा रे तू?’ म्हणत चाहत्यांनी उडवली पोट वाढत असलेल्या आझमची खिल्ली

Babar-Azam-Post-Replies
---Advertisement---

पाकिस्तानचा कर्णधार आणि सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत गणल्या जाणाऱ्या बाबर आझमची तुलन नेहमीच विराट कोहलीसोबत केली जाते. विराट कोहली भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. तेव्हा बाबर आझमच्या आकडेवारीच्या जोरावर या दोघांची तुमला होणे सहाजिक वाटते. मात्र, अशा परिस्थितीत सध्या बाबर आझमवर टीकांचे झोत उठले आहे. याला कारण ठरतायत त्यानी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेले काही फोटो.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचे वाढलेले वजन आणि पोटामुळे लोक त्याला ट्रोल करत आहेत. सध्या पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम हा विराट कोहलीचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जातो. तसे नसले तरी तो दिवसेंदिवस कोहलीने आपल्या विस्थापित केलेल्या प्रत्येक मोठ्या विक्रमाचा नाश करत आहे. क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू बाबरला भविष्यातील स्टार फलंदाज मानत आहेत. इतकेच नाही तर काही दिग्गजांनी त्यांना आजच्या जगाचा महान खेळाडू असेही संबोधले आहे. मात्र, त्याचे काही लेटेस्ट फोटो बघून अनेकांनी ‘क्या कोहली बनेगा रे तू?’ म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.

https://www.instagram.com/p/ChWytzrqvIe/?utm_source=ig_web_copy_link

खरं तर, कोहलीने इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. त्याने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली, त्यामुळेच तो इथपर्यंत पोहोचू शकला. मात्र, बाबरचे ताजे फोटो पाहता तो त्याच्या फिटनेसची जास्त काळजी घेतो असे वाटत नाही. पाकिस्तानी स्टार फलंदाजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचे पोट बाहेर येताना दिसत आहे, जे त्याच्यासाठी चांगले लक्षण नाही. बाबरला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अशा परिस्थितीत, जर तो त्याच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत असेल तर तो लवकरच जमिनीवर देखील येऊ शकतो.

babar-4.
Photo Courtesy : Instagram/ BabarAzam

बाबर आझमने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करून त्याचे चाहतेही आपली मते मांडत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘@babarazam258 तुमचा फिटनेस सांभाळा सर. हे खरोखरच चिंताजनक आहे. तुम्ही पाकिस्तानची संपत्ती आहात.’

babar-5
Photo Courtesy : Instagram/ BabarAzam

दरम्यान, बाबरने पाकिस्तान संघासाठी आत्तापर्यंत २०७ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना २३३ डावात १०३८१ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३१२२ धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४५७३ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६८६ धावा केल्या आहेत. शिवाय सध्या आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत त्याने आपल्या फिटनवेसवर लक्ष द्यावे या गोष्टीकडे चाहत्यांनी लक्ष वेधले आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बुड्ढे में है दम! अँडरसनने वयाच्या चाळीसीत मोडला ११० वर्ष जूना विक्रम, नावे केला वर्ल्ड रेकॉर्ड

एकेवेळी १० पेग पिऊन शतक ठोकणारा कांबळी आता नोकरीसाठी दारुही सोडायला तयार

‘लॉर्ड्स’चा लॉर्ड बनला ब्रॉड! ‘ती’ आगळीवेगळी कामगिरी करणारा अँडरसननंतर केवळ दुसराच गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---