ऑस्ट्रेलियात सुरू असलेला पुरूष संघाच्या आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup)अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान-इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भिडणार आहेत. अंतिम सामना असल्याने अर्थातच दोन्ही संघावर अधिक दबाव असेल, मात्र पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आमच्यावर कसलाच दबाव नाही, असे विधान केले आहे. हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
अंतिम सामन्याच्या एक दिवसाअगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत बाबर आझम (Babar Azam) म्हणाला, “फायनलसाठी आम्ही नर्व्हस नाही तर अधिक उत्साही आहोत. इंग्लंड एक उत्तम संघ आहे. तसेच नुकतेच आम्ही त्यांच्याविरुद्ध एक मालिकाही खेळलो. त्याच लयीत आम्ही अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरणार आहोत.”
पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात सप्टेंबर महिन्यात सात सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. यामध्ये इंग्लंडने यजमान संघाचा 4-3 असा पराभव केला होता.
पॉवर-प्ले असेल महत्वाचा
पाकिस्तानने गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरीकडे इंग्लंडने देखील भारताचा 10 विकेट्सने पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात दोन्ही संघांना पॉवरप्लेमध्ये अधिक धावा करणे अत्यावश्यक आहे. बाबर म्हणाला, पॉवरप्ले महत्वाचा असून फलंदाज सुरूवातीलाच खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रिलॅक्स होत आमचे 100 टक्के योगदान देणार आहोत. आम्ही आमच्या प्लॅननुसारच मैदानात उतरणार आहोत.
पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरचे बाबरने कौतुक करत म्हणाला, “मधल्या फळीतील फलंदाजांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. ते पाहून माझाही आत्मविश्वास वाढला. जेव्हा तुम्ही कर्णधार असता आणि चांगली कामगिरी करत नसाल तर तुमच्यावर अधिक दबाव येतो.”
बाबरची या स्पर्धेच्या सुरूवातीला बॅट शांतच होती. यामुळे त्याच्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्धशतक करत चोख प्रत्युत्तर दिले. त्याने न्यूझीलंड विरुद्ध 42 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. तसेच मोहम्मद रिझवान याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारीही केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: आयसीसीला मिळाला नवा अध्यक्ष! ‘या’ व्यक्तीची बिनविरोध निवड
संदीप लामिछानेनंतर 46 आतंरराष्ट्रीय सामने खेळणारा करणार नेपाळचे नेतृत्व, टी20मध्ये विकेट्सही घेतल्या